डान्स शिकवण्याच्या नावाखाली लैंगिक चाळे; डान्स टीचरजवळ सापडले १४ मुलींचे अश्लील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:11 PM2021-12-21T15:11:29+5:302021-12-21T15:13:13+5:30

Dance teacher molesting kids dance : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याची तक्रार आईने पोलिसांत केली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.

Sexual harassment under the guise of teaching dance; Pornographic videos of 14 girls found with dance teacher | डान्स शिकवण्याच्या नावाखाली लैंगिक चाळे; डान्स टीचरजवळ सापडले १४ मुलींचे अश्लील व्हिडिओ

डान्स शिकवण्याच्या नावाखाली लैंगिक चाळे; डान्स टीचरजवळ सापडले १४ मुलींचे अश्लील व्हिडिओ

Next

नृत्य शिकवण्याच्या नावाखाली निष्पाप मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका डान्स टीचरला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर तो मुलीच्या लैंगिक शोषणाचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत होता. मुलगी घाबरून तिच्या आईच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत होती.

बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याची तक्रार आईने पोलिसांत केली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या डान्स टीचर आर्यन सोनी उर्फ ​​हिमांशू सोनी याला गोविंद नगरचे पोलीस निरीक्षक रोहित तिवारी यांनी अटक केली.

तपासात आर्यन सोनी हा दाबौली येथील अर्बन डान्स अॅकॅडमीच्या नावाने चार वर्षांपासून डान्स क्लासेस चालवत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तीन निष्पाप मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याने मुलींचे अश्लील व्हिडिओही बनवले होते. हे सर्व व्हिडिओ पोलिसांनी आरोपी आर्यन सोनीच्या मोबाईलमधून जप्त केले आहेत.

पोलिसांनी आर्यनला अटक केली आहे. पोलिसांनी अशा शातीर आरोपीला अशा छुप्या पद्धतीने कारागृहात का पाठवले? या प्रश्नाला उत्तर देताना, इन्स्पेक्टर गोविंद नगर रोहित तिवारी सांगतात की, मुलींच्या पालकांना त्यांची ओळख लपवायची होती. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये ३७६, ३७७, ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sexual harassment under the guise of teaching dance; Pornographic videos of 14 girls found with dance teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.