मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:58 PM2020-07-22T14:58:01+5:302020-07-22T15:02:34+5:30
याप्रकरणी माउली सेवा प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. सुचेता राजेंद्र धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि़२१) फिर्याद दिली़ यावरुन अभय बाबूराव कडू (वय ५८, रा. आनंदनगर सिंहगड रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : तरुणीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर आरोपीने कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरातील पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात सोमवारी (दि़२०) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी माउली सेवा प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. सुचेता राजेंद्र धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि़२१) फिर्याद दिली़ यावरुन अभय बाबूराव कडू (वय ५८, रा. आनंदनगर सिंहगड रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या घटनेतील २७ वर्षीय पीडित तरुणी स्वभावाने भोळसर असल्याने ती औरंगाबाद शहरात एकटीच राहत होती. आरोपी अभय कडू हा महिनाभरापूर्वी औरंगाबाद येथे गेला तेव्हा ही तरुणी त्याच्या निदर्शनास आली. तो तिला कारमधून पुणे येथे घेऊन गेला. आरोपीने एक महिना त्या तरुणीला त्याच्याजवळ ठेवून तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी रात्री अभय कडू त्या तरुणीला घेऊन औरंगाबाद येथे निघाला होता. पहाटेच्या सुमारास कार नगर-पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आली. यावेळी कडू याने कार रस्त्याच्या बाजूला घेऊन तरुणीला विवस्त्र करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रसंगाने घाबरून गेलेली ही तरुणी विवस्त्र अवस्थेत कारमधून बाहेर पळाली. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना ही पीडित तरूणी शहरातील चांदणी चौक परिसरात विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळताना आढळून आली.
याबाबत माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. धामणे यांनी पोलिसांच्या मदतीने या तरुणीस शिंगवे नाईक येथील माउली प्रतिष्ठानमध्ये नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी तिची प्रकृती सुधारल्यानंतर घडलेली घटना तिने डॉक्टर सुचेता धामणे यांना सांगितली. तिची मानसिक स्थिती सामान्य नसल्याने डॉ़ धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पीडित तरूणीवर आरोपी अभय कडू याने अत्याचार केल्यानंतर ती कारमधून पळून गेली होती. हे प्रकरण अंगावर येऊ नये म्हणून सोमवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन कडू याने ही तरुणी मनोरुग्ण असून ती माझ्या मित्राची मुलगी आहे व ती हरवली आहे, अशा स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र, पीडित तरुणीने डॉक्टर धामणे यांना सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर आरोपीचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरण सुरसे व पोलीस पथकाने आरोपीला तत्काळ अटक केली़.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती