अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 15:28 IST2018-12-20T15:00:36+5:302018-12-20T15:28:46+5:30
पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपी अटकेत
औंध: पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ही घटना औंध जवळ एका सार्वजनिक शौचालयात घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,उमेश उर्फ पप्पु रविंद्र सरकनीया (वय ३१) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश याने पीडित ५ वर्षीय चिमुकलीसोबत औंध येथील सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेची आई तेथे पोहचली यामुळे पुढील अनर्थ टळला. पीडितेच्या आईने आरोपीला याचा जाब विचारला असता त्याने कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सांगवी पोलिसांत त्यांनी तक्रार दिली पोलिसांनी आरोपी उमेशला जेरबंद केले.सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.