सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत लैंगिक विकृती, गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:07 AM2022-06-20T10:07:11+5:302022-06-20T10:11:56+5:30

Dombivali Crime News : सांस्कृतिक बिवली व ऐतिहासिक शहर कल्याण हे गेल्या काही दिवसांत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर ३३ तनगरी डोंरुणांनी वरचेवर बलात्कार केल्याच्या घटनेने शहर हादरले होते. आता कल्याणमधील एक अल्पवयीन मुलीवर किमान सात तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

Sexual perversion in the cultural city of Dombivli | सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत लैंगिक विकृती, गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत लैंगिक विकृती, गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

Next

- प्रशांत माने
सांस्कृतिक बिवली व ऐतिहासिक शहर कल्याण हे गेल्या काही दिवसांत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर ३३ तनगरी डोंरुणांनी वरचेवर बलात्कार केल्याच्या घटनेने शहर हादरले होते. आता कल्याणमधील एक अल्पवयीन मुलीवर किमान सात तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या दुष्कृत्यात दोन तरुणीही सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अत्याचार असह्य झाल्याने या तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, की तिला तसे करायला भाग पाडले, याची चर्चा सुरू आहे. बहुतांश सुशिक्षित लोकवस्ती असलेल्या या शहरात विकृत, वासनांध प्रवृत्ती बोकाळल्याचेच या घटना निदर्शक आहेत.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर अनलॉक झाल्यावर या दोन्ही शहरांना गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. चोऱ्या, लूटमार, हत्या अशा घटनांनी ही शहरे सध्या चर्चेत आहेत. बेरोजगारी आणि झटपट पैसा कमावण्याच्या आमिषापोटी या घटना वरचेवर घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्या आणि लैंगिक अत्याचारांचे गुन्हेही वाढले असून, बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी परिचित व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या दोन्ही शहरांत लैंगिक अत्याचारांच्या घटना नवीन नाहीत. परंतु समाजात बदनामी होईल, अत्याचार करणारी व्यक्ती जवळची असल्यामुळे घाबरून तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. पोलिसांकडे गेल्यावर त्रास होईल, अशी भीती होती. परंतु पोलिसांनी तसेच सामाजिक संघटनांनी झालेल्या जनजागृतीनंतर मात्र निर्भयपणे तक्रारी दाखल करण्याकडे कल वाढला आहे. घटनांची उकल पोलिसांकडून होत असली तरी घटना मात्र कमी होताना दिसत नाहीत. बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील कमालीची झालेली वाढ चिंता वाढवणारी आहे. 
पॉक्सोअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपशील पाहता, बहुतांश घटनांमधील आरोपी पीडितेच्या परिचयातीलच आहेत. डोंबिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३३ नराधमांनी नऊ महिन्यांमध्ये आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गतवर्षी २३ सप्टेंबरला उघडकीस आली. आरोपींमध्ये प्रियकर, त्याचे मित्र यांचा समावेश होता. 
कल्याणमध्ये एका आठवर्षीय मुलीवर खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना देखील सप्टेंबर महिन्यातच घडली होती. सात वर्षांच्या मुलीवर तिच्या जवळच्या नातेवाइकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सात वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये उघडकीस आली. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कल्याण पूर्वेत घडली. यात विकृतीने कळस गाठला होता. एका मुलीने १४ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले, तर या तरुणीच्या प्रियकराने त्या पीडित अल्पवयीन मुलाच्या १६ वर्षांच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. नोव्हेंबरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. गेल्या रविवारी कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारांना कंटाळून केलेली आत्महत्या ही डोंबिवलीतील सप्टेंबर महिन्यात उघड झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाशी मिळतीजुळती आहे. परंतु यात मुलीला जीव गमवावा लागला आहे. यातील आरोपी तिचे मित्र आहेत. मित्र, शिक्षक, प्रियकर, भाऊ, जवळचा नातेवाईक, ओळखीची व्यक्ती अशा व्यक्तींकडून मुलींवर अत्याचार झाल्याचे आतापर्यंतच्या घटनांमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे शाळा, क्लास, शेजारी, नातेवाईक, घर आणि घराच्या आसपासचे वातावरण सुरक्षित आहे का? अशी शंका उपस्थित होते. 

- लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने या दोन्ही शहरांत बेरोजगारांची संख्या वाढली आहे. मुंबई व अन्य भागांतून रोजगाराच्या शोधात काहीजण येथे आले आहेत.
- रोजगार मिळाला नाही तर या शहरांत महागाईमुळे जगणे मुश्कील होते. मग चोरीचा मार्ग अवलंबल्याचे उकल होणाऱ्या गुन्ह्यांमधून निदर्शनास आले आहे.
- गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटना एकामागोमाग घडत आहेत. हादेखील चिंतेचा विषय असून, गेल्या तीन ते चार महिन्यांत घडलेल्या घटनांमध्ये परिचित व्यक्तीनेच जीव घेतल्याचे उघड झाले आहे.

 प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असून, पोर्न वरचेवर पाहण्यामुळे लैंगिकतेच्या विकृत कल्पना वाढत चालल्या आहेत.
  तरुण पिढी घरात, कुटुंबात मोकळेपणाने बोलत नाही. 
 तरुण पिढी त्यांच्या मोबाइलमध्ये, तर पालक सोशल मीडियावर व्यस्त असतात. त्यामुळे मुला-मुलींसोबत घराबाहेर किंवा घरात काय घडत आहे, याची कल्पना पालकांना नसते.
 शरीरसंबंध करताना फोटो, व्हिडिओ काढू द्यायचे व त्यानंतर तेच व्हायरल करण्याची धमकी देऊन वरचेवर लैंगिक शोषण करायचे, ही सर्रास कार्यपद्धती झाली आहे.
 मुले-मुली कुणाशी चॅट करीत आहेत, काय पाहत आहेत, याचा पत्ता पालकांना नसतो. पालकांनी मुलांच्या खासगी आयुष्यात डोकावलेले मुलांनाही आवडत नाही. त्यामुळे लैंगिक शोषण होत असले तरी मुले-मुली त्याची वाच्यता पालकांकडे करीत नाहीत. 

Web Title: Sexual perversion in the cultural city of Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.