शाहरूख खान-सलमान खानमध्ये खामगावात हाणामारी, दोघे जखमी; आठ जणांविरोधात गुन्हा

By अनिल गवई | Published: May 21, 2024 12:55 PM2024-05-21T12:55:05+5:302024-05-21T12:57:23+5:30

गिऱ्हाईकाचा वाद विकोपाला गेल्यानंतर पोलिसांत दिलेली तक्रार जिव्हारी लागल्याने घडला प्रकार

Shah Rukh Khan and Salman Khan Clash in Khamgaon both Injured Case registered against 8 persons | शाहरूख खान-सलमान खानमध्ये खामगावात हाणामारी, दोघे जखमी; आठ जणांविरोधात गुन्हा

शाहरूख खान-सलमान खानमध्ये खामगावात हाणामारी, दोघे जखमी; आठ जणांविरोधात गुन्हा

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव, जि. बुलढाणा: गिऱ्हाईकाच्या वादातून फळ विक्रेत्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले. ही घटना सोमवारी उशीरा रात्री स्थानिक बर्डे प्लॉट भागात घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन्ही गटातील आठ जणांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, गिऱ्हाईकाचा वाद विकोपाला गेल्यानंतर पोलिसांत दिलेली तक्रार जिव्हारी लागली. त्यामुळे तक्रारदार शाहरूख खान आणि त्याचा भाचा शेख आमीन रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी संशयित सलमान खान नुरखान (२७), अरबाज खान नूरखान (२५), वसीमखान मुरखान (२९), नइमखान नुरखान (२३) (सर्व रा. मिल्लत शाळेजवळ बर्डेप्लॉट) यांनी संगनमत करून तक्रारदार व त्यांच्या भाच्याला अश्लील शिवीगाळ केली. तर अरबाज खान नूरखान याने हातातील कटरने शाहरूख खान यांच्या डाव्या हातावर, छातीवर, पोटावर मारून जखमी केले. तर सलमानखान नुरखान याने लोखंडी पाइपने फिचे डोक्यावर मारहाण केली. कटरने केलेल्या मारहाणीत फिचे हाताचे व पोटाचे रक्त निघाल्याचे शाहरूख खान यांनी तक्रारीत म्हटले.

पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी उपरोक्त आरोपी विरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तर सलमान खान नूरखान २७ यांच्या तक्रारीनुसार ते फळ विक्री करून घरी परतत असताना फळ विक्रीच्या गिर्हाईकीच्या वादातून शाहरुखान बाबाखान ३१, शाहबाजखान बाबाखान २६, जमशेदखान बाबाखान ३४, शेख आसीफ शेख नुरा ३६ यांनी संगनमत करून शिवीगाळ करीत मारहाणीची धमकी दिली. त्यावेळी तक्रार सलमान खान यांनी संशयितांना घटना स्थळावरून निघून जाण्यास सांगितले. त्यावेळी शाहरूख खानने सलमान खानच्या कपाळावर, उजव्या हाताच्या बोटावर, उजव्या पायावर लोखंडी पाइपने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या कपाळावर बेंड आल्याचे म्हटले. या प्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी उपरोक्त चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Shah Rukh Khan and Salman Khan Clash in Khamgaon both Injured Case registered against 8 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.