Aryan Khan Arrest, Breaking News: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBकडून अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 04:19 PM2021-10-03T16:19:31+5:302021-10-03T16:20:07+5:30

Aryan Khan Arrest: मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक

Shah Rukh Khan son Aryan Khan arrested in mumbai drug case | Aryan Khan Arrest, Breaking News: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBकडून अटक!

Aryan Khan Arrest, Breaking News: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी NCBकडून अटक!

Next

Aryan Khan Arrest: मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आता चौकशीअंती अमलीपदार्थ नियंत्रक कक्षानं (NCB) अखेर अटक केली आहे. आर्यन खानसह एकूण तीन जणांना याप्रकरणी अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. तिघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेण्यात आलं आहे. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांनाही किला कोर्टात हजर केलं जाणार आहे. 

आर्यन खानला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीकडून त्याची पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली काल मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीनं सापळा रचून छापा टाकला होता. यात मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावण्यात आली आणि एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यात तीन मुलांचाही समावेश आहे. आठ आरोपींकडून चरस, एमडीएमए, एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आलं होतं. 

समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली गेली. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली. 

Read in English

Web Title: Shah Rukh Khan son Aryan Khan arrested in mumbai drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.