डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:35 PM2024-11-01T16:35:22+5:302024-11-01T16:36:01+5:30
अल्पवयीन मुलगा हा आकाश यांचा दूरचा नातेवाईक आहे.
राजधानी दिल्लीतील शाहदरा भागातील बिहारी कॉलनीत झालेल्या डबल मर्डरचं गूढ उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या डबल मर्डरप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला पकडलं आहे. चौकशीत अल्पवयीन मुलाने ७० हजार रुपयांच्या व्यवहारातून ही हत्या केल्याचं उघड झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा हा आकाश यांचा दूरचा नातेवाईक आहे. आकाश यांना ७० हजार रुपये द्यायचे होते. मुलगा रोज फोन करायचा पण आकाश त्याचे पैसे परत करत नव्हते. काही दिवसांपासून त्यांनी मुलाचे फोन उचलणंही बंद केलं होतं. त्यामुळे तो चिडला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने आकाश यांची हत्या करण्याचा कट रचला.
#WATCHदिल्ली: शाहदरा डबल मर्डर केस पर DCP शाहदरा प्रशांत गौतम ने कहा, "...इस घटना में तीन लोगों आकाश, ऋषभ और कृष को गोली लगी है जो आपस में रिश्तेदार हैं... आकाश और ऋषभ की मौत हो गई है। इस मामले में एक नाबालिग को पकड़ा गया है... प्रथम दृष्टया ऐसा लगता है कि नाबालिग और मृतक आकाश… pic.twitter.com/BtlwnENZFW
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2024
अल्पवयीन मुलाने १७ दिवसांपूर्वी हत्येचा कट रचला होता आणि २, ३ दिवसांपासून तो आकाश यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. दिवाळीच्या दिवशी रात्री ८.३० च्या सुमारास आकाश आपल्या कुटुंबीयांसोबत घराबाहेर दिवाळी साजरी करत असताना अचानक अल्पवयीन मुलगा शूटरसह स्कूटीवरून तेथे पोहोचला.
आकाश यांच्यावर गोळीबार केला. शूटरने ऋषभवरही गोळीबार केला. मारेकरी फक्त आकाशला मारण्यासाठी आले होते, मात्र मध्येच ऋषभ आल्याने त्यांना त्याच्यावरही गोळी झाडावी लागली. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी जखमी झाला. आता पोलीस या अल्पवयीन व्यक्तीची सतत चौकशी करत असून शूटरची माहिती गोळा करत आहेत.