अट्टल दरोडेखोरांच्या सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या; शहापूर पोलिसांची धडक कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:08 AM2021-10-12T10:08:40+5:302021-10-12T10:09:05+5:30
पोलीस पाठलाग करित असल्याचे लक्षात येताच बोलेरो तील आरोपीनी पोलिसांना हुलकवणी देण्याचा प्रयत्न केला.
शाम धुमाळ..
कसारा - पुणे,सातारा,सह विविध ठिकाणी जबरी चोऱ्या ,घरफोडी,दरोडे टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या मुख्य आरोपीना आज रात्री ८ ते ९;२० वाजे दरम्यान शहापूर पोलिसांनी सिनेस्टाईल थरार पाटलाग करून मोठ्या शिताफीने 2 जणांना वाहणासह अटक केली. सातारा येथून जबरी चोरी सह विविध गुन्हे करून पळालेली टोळी शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहिती नुसार.ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे,गजेंद्र पालवे, श्रीकांत जाधव,पी.एस आय विकास निकम,स्थानिक गुन्हे शाखेचे भास्कर जाधव व पोलीस कर्मचारी पोलीस नाईक लिलके ,मनोज सानप ,सुरेश खडके ,शशिकांत दिघे ,यांनी ठीक ठिकाणी नाका बंदी करून तपास कार्य सुरु केले, या दरम्यान पथकाने पुण्या कडे जाणाऱ्या किन्हवली रस्त्याकडे आपले शोध कार्य सुरु केलें याचं दरम्यान किन्हवली जवळ एक संशयित बोलेरो गाडी मुरबाडरोड कडे जाताना पोलिसांना दिसून आली. त्या बोलेरो पाठलाग पोलिसांनी पाठलाग सुरु केला.
पोलीस पाठलाग करित असल्याचे लक्षात येताच बोलेरो तील आरोपीनी पोलिसांना हुलकवणी देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्या बोलेरो गाडीला ओव्हर टेक करित घेरले. पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच गाडीतील 5 जणांनी पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.हत्यार असलेल्या चोरानी पोलिसांशी झटापटी केली.या झटापटी त गाडी सोडून जंगलात पळुंन जण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी खाकी चा रंग दाखवत त्यांना प्रतिकार करित रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांचा पाठलाग केला व दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या शकील अहमद ,आझाद सलमानी दोन्ही राहणार उत्तर प्रदेश असे दोन जन पकडले असून बोलेरो गाडी सुद्धा पोलिसांनी तब्ब्यात घेतली आहे... लाखोची चोरी,सह मारहाणीचे गुन्हे करून पळालेल्या या आरोपी ना सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असून.या अटक केलेल्या दुकली कडून विविध गुन्ह्यांची माहिती उघड होणार आहे.
आंतरराज्य टोळी असल्याचा संशय
दरम्यान क्रूर कृत्य करून चोरी,दरोडे च्या उद्देशाने मारहान करून गभीर दुखपत करून जबरी चोरी करणारी पण टोळी आंतर राज्य टोळी असल्याचे समजते.