लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:49 IST2022-07-06T18:48:44+5:302022-07-06T18:49:44+5:30
Rape case : मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक
जगाधरी : हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील जगाधरी कॉलनीत राहणारी १५ वर्षांची मुलगी आजारी पडल्यावर तिच्या आईने तिला रुग्णालयात आणले. तपासणीनंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकूनआईच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. आईच्या सांगण्यावरून मुलीने आपबिती सांगितली. तेव्हा तिच्या आईच्या अंगावर काटा आला. मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.
घाबरलेली मुलगी गप्पच राहिली
मामाने तिला धमकी दिल्यानंतर भाची प्रचंड घाबरली होती आणि तिने याबाबत कोणालाच सांगितले नाही. मात्र, आता हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात जाऊन आपल्या भावाचे सर्व दुष्कृत्य सांगितले. पोलिसांनी आरोपी संजू वैश याला अटक केली आहे.
आरोपी सध्या जगाधरी झंडा चौकाजवळील लोहारण मोहल्ला येथे राहतो. आरोपींविरुद्ध 1 जुलै रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकारी गुरदियाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची मेडिकल आणि डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे.