लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 20:36 IST2020-06-24T20:34:14+5:302020-06-24T20:36:52+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हिरपोरा पोलिस स्टेशन येथे एका मुलीने याबाबत लेखी तक्रार दिली.

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार
शोपियान पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी भाजपाचा पंच फरार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हिरपोरा पोलिस स्टेशन येथे एका मुलीने याबाबत लेखी तक्रार दिली.
या तक्रारीत भाजपा पंच लतीफ जगल याच्यावर अपहरण, विनयभंग आणि बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या घटनेत मदत करणारे भाजपाच्या पंचाचे इतर चार साथीदार आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली. लतीफ जगलने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने पीडित मुलीचे अपहरण केले आणि अज्ञात स्थळी नेले. दोन दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुख्य आरोपी शोपियानमधील चेक एम्सीपोरा गावचा आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुख्य आरोपी असलेल्या भाजपाच्या पंचाला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. तो अद्याप फरार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भाजपाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ
धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार
६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती
बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण
धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा
Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं
नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता