लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले हरियाणाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:15 PM2022-02-03T19:15:08+5:302022-02-03T19:15:57+5:30

Gangrape Case :पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले.

Shame! Accused forcibly brought victim from Ludhiana to Haryana, gangraped in running car | लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले हरियाणाला 

लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले हरियाणाला 

googlenewsNext

हिसार -  हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात पंजाबमधील एका तरुणीवर चालत्या कारमध्ये ६ तरुणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 30 जानेवारी रोजी आझाद नगर पोलिस ठाण्यात मुलीने सांगितले की, आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला बेशुद्ध करून पळून गेले. पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले.

रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या


पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले आहे की, ती तिच्या आत्याच्या मुलीसोबत राहायची. तिने तिला एका तरुणीशी भेटायला लावले. ती त्या मुलीला लुधियाना बसस्थानकावर घेऊन गेली आणि तिथे राकेश नावाच्या तरुणाने तिच्या भांगेत जबरदस्तीने सिंदूर भरले. त्यानंतर सर्वजण तिला गाडीत बसवून हिस्सारच्या दिशेने निघाले आणि वाटेत सर्व तरुणांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि नंतर तिला बेशुद्ध अवस्थेत हिसार सोडून पळ काढला.

हिसारच्या आझाद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, पीडित मुलगी 30 जानेवारी 2021 रोजी पोलिस स्टेशनमध्ये आली आणि लुधियाना येथील 6 मुलांनी तिला हिसार येथे आणले आणि या सर्वांनी वाटेत चालत्या वाहनात तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार नोंदवली आहे. यानंतर हिसारला बेशुद्ध अवस्थेत सोडून तेथून पळ काढला असं पिडीतेचं म्हणणं आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून पोलिस स्टेशन डिव्हिजन क्रमांक 5 लुधियाना पोलिसांकडे पाठवला आहे. पीडित मुलीचे मेडिकल करून तिला वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मुलीला हिसार पोलिसांच्या देखरेखीखाली मिनी सचिवालयातील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. आता लुधियाना पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना पोलिसांचे पथक पीडितेला घेण्यासाठी गुरुवारी हिस्सारला पोहोचेल.

Web Title: Shame! Accused forcibly brought victim from Ludhiana to Haryana, gangraped in running car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.