खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:45 PM2020-07-08T19:45:00+5:302020-07-08T19:49:46+5:30
गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. याबाबत तपास सुरु आहे.
पूनम अपराज
मुंबई - मुंबईत पोलीस खात्यात खळबळजनक घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलिसाने काल रात्री तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. याबाबत तपास सुरु आहे.
खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग, मुंबईत तक्रार दाखल
— Lokmat (@MiLOKMAT) July 8, 2020
कोरोनाच्या काळात पोलीस योद्धा म्हणून कंबर कसत आहेत. त्यातच महिला पोलिसांची तारेवरची कसरत सुरु आहेत. व्यस्त कामकाज आणि कामाचा तणाव असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून यवतमाळ येथील सहाय्य्क पोलीस निरीक्षकाने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील मेसेजेस सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पाठवले. त्यानंतर तणावात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने याबाबत वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी गुन्हा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात