खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 09:59 PM2020-05-20T21:59:04+5:302020-05-20T22:00:44+5:30

नीमराणा पोलीस ठाण्यात पीडित युवती तक्रार दाखल करण्यास गेली असता तिला  संबंधित पोलीस चौकीत पाठवण्यात आले.

Shame on Khaki! A young woman who came to lodge a complaint at the police station was molested by a police officer pda | खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

Next
ठळक मुद्देतक्रार नोंदवल्यानंतर चौकी प्रभारी एएसआय सुरेंद्र सिंह यांनी घर सोडण्याच्या बहाण्याने मुलीला आपल्या वाहनात  बसविले. त्याने तिला जपानी औद्योगिक क्षेत्रात नेले आणि तिची छेड काढत तिचा विनयभंग केला आहे.भाडेकरूसाठी पैसे नसल्याची आणि घरमालकाकडून दबाव आणल्याची तक्रार तिने केली.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली राजस्थानपोलिस सहउपनिरीक्षक (एएसआय) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय महिला एका कंपनीत काम करते. नीमराणा पोलीस ठाण्यात पीडित युवती तक्रार दाखल करण्यास गेली असता तिला  संबंधित पोलीस चौकीत पाठवण्यात आले.

असा आरोप आहे की, तक्रार नोंदवल्यानंतर चौकी प्रभारी एएसआय सुरेंद्र सिंह यांनी घर सोडण्याच्या बहाण्याने मुलीला आपल्या वाहनात  बसविले. त्याने तिला जपानी औद्योगिक क्षेत्रात नेले आणि तिची छेड काढत तिचा विनयभंग केला आहे. भिवाडीचे पोलिस अधीक्षक अमनदीप सिंग कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 17 मे रोजी एएसआयविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि मंगळवारी एएसआयला अटक करण्यात आली.'


नीमराणा पोलिस स्टेशन प्रभारी संजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये रेशन मिळविण्यासाठी या महिलेने मदत मागितली होत. त्याची  व्यवस्था झाली होती. पण नंतर भाडेकरूसाठी पैसे नसल्याची आणि घरमालकाकडून दबाव आणल्याची तक्रार तिने केली.

CoronaVirus News: मुंबई पोलीस दलातील कोरोनाचा सातवा बळी; सहाय्यक निरीक्षकाचा मृत्यू

 

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

 

Web Title: Shame on Khaki! A young woman who came to lodge a complaint at the police station was molested by a police officer pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.