लज्जास्पद! विवाहितेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केले अन् दिले फेकून 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 07:21 PM2020-07-20T19:21:14+5:302020-07-20T19:22:37+5:30

पीडित महिलेने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास केला.

Shame! kidnapped a married woman and gang-raped her and threw her away | लज्जास्पद! विवाहितेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केले अन् दिले फेकून 

लज्जास्पद! विवाहितेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केले अन् दिले फेकून 

Next
ठळक मुद्देगाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर गावात राहणाऱ्या एका महिलेचे रविवारी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरातून अपहरण करण्यात आले होते.पीडितेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी बुधन परिसरातील बुढाणा गावातील तरुणाशी झाले होते.

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील सरधना भागात सोमवारी सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. बलात्कारानंतर पीडितेला गंगनहरमध्ये टाकून आरोपी फरार झाले. पीडित महिलेने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास केला.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण

गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर गावात राहणाऱ्या एका महिलेचे रविवारी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरातून अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला अटेरना पुलाजवळ गंगनहर येथे फेकले. त्याचवेळी सोमवारी पहाटे दोन तरुण जंगलात शेतात काम करायला जात होते. यावेळी त्याने एका महिलेची प्रकृती खालावलेली पाहिली. महिलेकडून माहिती मिळताच तिने तिचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या महिलेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सरधना कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला सीएचसी येथे नेले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी उपेंद्र मलिक यांचे म्हणणे आहे.

त्याच वेळी पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबाशी फोनवरून संपर्क साधला. पीडितेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी बुधन परिसरातील बुढाणा गावातील तरुणाशी झाले होते. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ती तिच्या सासरच्या घरातून बेपत्ता झाली. त्यांनी सांगितले की, रात्री सासरच्यांकडून फोन आला. यानंतर सोमवारी सकाळी फोन आला की, आपली मुलगी अटेरना पुलाजवळ गंगनहर येथे सापडली आहे. पीडितेचे कुटुंबीय सरधना येथे येत आहेत.

दुसरीकडे सीओ जितेंद्र सरगम यांचे म्हणणे आहे की, अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी पीडितेच्या कुटूंबाला दिले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

Web Title: Shame! kidnapped a married woman and gang-raped her and threw her away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.