लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 09:44 PM2021-06-21T21:44:03+5:302021-06-21T21:44:53+5:30

Sexual Abuse : शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

Shame! The school owner sexually assaulted the minor girl | लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी ती वसतिगृहातून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि जवळच्या पोलिस ठाण्यात पोहोचली.

पाटणा : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

महिला पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार पीडितेने आरोप केला आहे की, औरंगाबादच्या दौदनगर भागात असलेल्या शाळेचा मालक राजू कुमार याने गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर बलात्कार केला.

रविवारी ती वसतिगृहातून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि जवळच्या पोलिस ठाण्यात पोहोचली. जेव्हा तिने तिचा त्रास सांगितला तेव्हा तिला ताबडतोब पोलिस कोठडीतील महिला पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.

पीडित विद्यार्थिनी हा वसतिगृहात एकटी राहत होती. तिचे वडील आणि आई गुजरातमधील एका खासगी कंपनीत काम करतात. मालकाला मुलीच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्याने त्याचा गैरफायदा घेतला. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.

 


महिला पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी सुमन कुमार म्हणाले, आरोपीने घटनेबद्दल कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. पुढे त्या म्हणाल्या, पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली आहे, त्यावरून बलात्काराचा गुन्हा उघड झाला आहे. राजू कुमार याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो आता फरार आहे.

Web Title: Shame! The school owner sexually assaulted the minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.