लज्जास्पद! राजधानी एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनींसोबत छेडछाड, लष्करातील जवानांचं घृनास्पद कृत्य; मद्यधुंद अवस्थेत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 08:15 PM2023-01-18T20:15:29+5:302023-01-18T20:17:14+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रूगडहून नवी दिल्लीला जात असलेल्या 20505 राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत आर्मीच्या दोन जवानांनी छेडछाड केली आहे.

Shameful Harassment of schoolgirls in Rajdhani Express, heinous act of army men; Arrested while intoxicated | लज्जास्पद! राजधानी एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनींसोबत छेडछाड, लष्करातील जवानांचं घृनास्पद कृत्य; मद्यधुंद अवस्थेत अटक

लज्जास्पद! राजधानी एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनींसोबत छेडछाड, लष्करातील जवानांचं घृनास्पद कृत्य; मद्यधुंद अवस्थेत अटक

googlenewsNext

दिब्रूगडहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये शाळेतील विद्यार्थिनींसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीच्या आरोपाखाली बिहारच्या छपरा रेल्वे पोलिसांनी लष्कराच्या दोन जवानांना अटक केली आहे. हे दोन्ही जवान मद्यधुंद अवस्थेत होते. हाजीपूर ते छपरा दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये हे अश्लील कृत्य झाल्याचे बोलले जात आहे. पीडित मुली उत्तर सिक्कीम येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रूगडहून नवी दिल्लीला जात असलेल्या 20505 राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत आर्मीच्या दोन जवानांनी छेडछाड केली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक बी -11 मध्ये 8 विद्यार्थी प्रवास करत होते. यात यात विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी होता. याच वेळी आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांनी अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. अश्लिल व्हिडिओ पाहू लागले.

संबंधित विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर आरपीएफ आणि रेल्वे प्रशासन दोन्ही अॅक्शन मोडवर आले आणि दोन्ही आरोपी जवानांना छपरा जंक्शन येथून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या जवानांमध्ये जम्मू-काश्मीरमधील लष्कराचा जवान अमरजीत कुमार आणि पंजाबमधील आयटीबीपी जवान मुकेश कुमार यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध छपरा रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रेल्वे कोर्ट सोनपूर येथे रवानगी करण्यात आली आहे. यापूर्वी सदर रुग्णालयात दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता दोघेही मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.

मोबाईलवर दाखवत होते, अश्लिल व्हिडिओ -
ट्रेन हाजीपूर आणि छपरा दरम्यान असताना आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांनी विद्यार्थिनींना त्यांच्या मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली आणि अश्लील कृत्येही सुरू केले. यानंतर ट्रेनमधील टीटीईकडे तक्रार करण्यात आली. टीटीईने तत्काळ ट्रेनमधील आरपीएफ एस्कॉर्ट टीमला याची माहिती दिली. एस्कॉर्ट टीमच्या जवानांनी कंट्रोल रूमला यासंदर्भात माहिती दिली. 

सोनपूर कंट्रोलला माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक मुकेश कुमारसिंह आणि रेल्वेचे एसएचओ राजेश कुमारसिंह हे आधीच छपरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर टीमसह हजर होते. त्यांनी संबंधित दोन्ही आरोपी जवानांना अटक केली. दोघांच्याही वैद्यकीय तपासणीबरोबरच रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत.

Web Title: Shameful Harassment of schoolgirls in Rajdhani Express, heinous act of army men; Arrested while intoxicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.