लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:13 PM2021-05-13T20:13:32+5:302021-05-13T20:16:32+5:30

Sexual Harrasment : कोव्हीड पॉझिटिव्ह पती आणि आईची काळजी घेत असतानाच तिचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे.

Shameful incident! A corona infected husband, mother taking care a woman was sexually abused by a wardboy | लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ 

लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ 

googlenewsNext
ठळक मुद्देएफआयआर दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी ज्योती कुमार याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. 

भागलपूर (बिहार): बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. कोव्हीड पॉझिटिव्ह पती आणि आईची काळजी घेत असतानाच तिचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी ज्योती कुमार याला पोलिसांकडूनअटक करण्यात आली.

ही घटना सोशल मीडियावर उघडकीस आल्यानंतर पत्रकार नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी प्रथम माहिती अहवाल म्हणजेच एफआयआर दाखल करण्यात आला. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या अशाच एका घटनेत, कोरोनाबाधित रूग्णाची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली इंदूर पोलिसांनी शुक्रवारी महाराज यशवंतराव रुग्णालयाच्या दोन वॉर्डबॉय यांना अटक केली.

तसेच भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोविड रुग्णासोबत वॉर्डबॉयने धक्कादायक घटना घडवून आणली. वॉर्डबॉयने कोरोना रुग्णावर बलात्कार केला. बलात्कारानंतर महिलेची तब्येत खालावली आणि तिला व्हेंटिलेटरमध्ये हलविण्यात आले. दुर्दैवी गोष्ट म्हणजे दुसर्‍याच दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबियांना सर्वसामान्य कोरोना रुग्णाच्या मृत्यूप्रमाणे झाल्यासारखे धरून चालत होते. महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली.

Web Title: Shameful incident! A corona infected husband, mother taking care a woman was sexually abused by a wardboy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.