लाजिरवाणी घटना! गरोदर महिलेच्या घरात घुसून केला बलात्कार; प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:47 PM2021-05-17T20:47:16+5:302021-05-17T20:48:41+5:30
Rape on Pregnent Women : या प्रकरणासंदर्भात डीएसपी म्हणतात की, आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.
बिहारमधील मुंगेरमधून माणुसकीला लाजविणारी घटना समोर आली आहे. दिवसा ढवळ्या घरात घुसून एका मध्यमवयीन व्यक्तीने १९ वर्षीय गर्भवती महिलेवर बलात्कार केला. महिलेला प्रकृती चिंताजनक स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणासंदर्भात डीएसपी म्हणतात की, आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.
गर्भवती महिलेवर बलात्कार
मुंगेर येथील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील मिर्जापूर बरदह गावची ही घटना आहे, जिथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गर्भवती महिलेसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा गुजरातमध्ये ट्रक चालवतो आणि घरी ती जावेसह राहते. पीडित महिलेने पुढे सांगितले की, ती जेव्हा घरी एकटी होती तेव्हा शेजारच्या भागात राहणाऱ्या आरोपीने घरात घुसून चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला.
Free Fire game गेमप्रमाणे मान मोडून केली मित्राची हत्या, लपवण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरलाhttps://t.co/fnMpvCQv5C
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2021
चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार
या प्रकरणात पीडितेच्या जावेने पोलिसांना सांगितले की, आरोपीने त्यांना नेहमी त्रास दिला. जेव्हा जेव्हा पीडितेला पाणी आणण्यासाठी त्याच्या घरी जावे लागत असे तेव्हा तो तिला त्रास देत असे आणि चुकीच्या मार्गाने तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असे.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला
या प्रकरणात सदर डीएसपी नंद जी प्रसाद यांनी सांगितले की, मिरजापूर बरादा या गावात एक विवाहित महिला राहते आणि तिचा नवरा गुजरातमध्ये ट्रक चालवित आहे आणि जेव्हा ती घरी एकटी होती, तेव्हा गावातील एक ५० वर्षीय तरुण तिच्या घरात घुसला आणि दुष्कर्म घडवून आणले. सदर महिलेला उपचारासाठी सदर रुग्णालयात आणण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी करण्यात येत आहे. तो सध्या फरार आहे. ही पीडित महिला गर्भवती आहे की नाही याचीही चौकशी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.