वाहन चोरी करणाऱ्या त्रिकुटाच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १४ दुचाकींसह ४ रिक्षा जप्त 

By नितीन पंडित | Published: May 22, 2023 05:32 PM2023-05-22T17:32:25+5:302023-05-22T17:32:43+5:30

पोलिसांनी सतर्कतेने तपास करीत वाहन चोरीतील अट्टल त्रिकुटास जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे.

Shanti Nagar police crack down on vehicle theft trio; 4 rickshaws seized along with 14 two-wheelers | वाहन चोरी करणाऱ्या त्रिकुटाच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १४ दुचाकींसह ४ रिक्षा जप्त 

वाहन चोरी करणाऱ्या त्रिकुटाच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १४ दुचाकींसह ४ रिक्षा जप्त 

googlenewsNext

भिवंडी: शहरात वाहन व मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच पोलिसांनी सतर्कतेने तपास करीत वाहन चोरीतील अट्टल त्रिकुटास जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे.या तीन जणांच्या एका टोळीकडून तब्बल १४ दुचाकी ४ रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

शहरात वाहन व मोबाईल चोरी च्या घटना वाढलेल्या असताना पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांना पोलिस ठाणे हद्दीत सतर्कतेने गस्त घालण्याचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,पोलीस निरीक्षक (प्रशा) निलेश बडाख,पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे,संतोष तपासे,पोलिस हवालदार रविंद्र चौधरी,महेश चौधरी, रिजवान सैयद,पोलिस नाईक किरण जाधव,श्रीकांत पाटील,किरण मोहीते,पोलिस शिपाई रविंद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर,दिपक सानप,मनोज मुके,तौफीक शिकलगार,विजय ताटे या पोलिस पथकाने गुप्त बातमीदारा व तांत्रिक तपासाद्वारे बिलाल रिजवान अंसारी,वय २७ रा.गैबीनगर यास त्याच्या मूळ गाव असलेल्या मालदा, मालेगाव जि.नाशीक यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करून भिवंडीतून मोहमद सैफ शफीक खान, वय २४,रा.शांतीनगर,राहील फकीरउल्ला अंसारी,वय २६ रा.गैबीनगर यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे शांतीनगर पोलीस ठाणे येथील ११ गुन्हे, निजामपुरा पोलीस ठाणे येथील ३ गुन्हे,नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी शहर पोलीस ठाणे, भिवडी तालुका पोलिस ठाणे येथील प्रत्येकी १ अशा एकूण १७ गुन्ह्यांची उकल करीत त्यांचे कडुन ७ लाख ९० हजार रुपये किमतीच्या १४ दुचाकी व ४ रिक्षा अशी १८ वाहने जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सोमवारी दिली आहे.

Web Title: Shanti Nagar police crack down on vehicle theft trio; 4 rickshaws seized along with 14 two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.