शेअर ट्रेडिंग फसवणूक; ३ संचालकांना जामीन, विलेपार्ले पोलिसांकडून अधिक तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 09:20 AM2022-08-30T09:20:30+5:302022-08-30T09:21:03+5:30

share trading fraud: शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या अर्थ वृद्धी सिक्युरीटीज प्रा. लि. या ट्रेडिंग कंपनीच्या तिन्ही संचालकांना अटीशर्तीसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

share trading fraud; Bail to 3 directors, further investigation by Vileparle police | शेअर ट्रेडिंग फसवणूक; ३ संचालकांना जामीन, विलेपार्ले पोलिसांकडून अधिक तपास सुरू

शेअर ट्रेडिंग फसवणूक; ३ संचालकांना जामीन, विलेपार्ले पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Next

मुंबई : शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या अर्थ वृद्धी सिक्युरीटीज प्रा. लि. या ट्रेडिंग कंपनीच्या तिन्ही संचालकांना अटीशर्तीसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार सुनील गिरी यांच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी अर्थ वृद्धी सिक्युरीटीज प्रा. लि. या ट्रेडिंग कंपनीचे संचालक धीरेंद्र शुक्ला, अनुराग शुक्ला, सुनील जैन व बिझनेस कंन्सलटंट जयराज बाफना यांच्याविरोधात २१ जुलै रोजी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात तिघांना अटक झाली. याच, प्रकरणात सुनील जैन यांच्यासह अन्य संचालकांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.

दिंडोशी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जे. खान यांच्या खंडपीठाने जामिनावर सुनावणी करताना नोंदविलेल्या निरीक्षणात, तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ०१ जुलै २०१९ ते ०५ जुलै २०२१ पर्यंत एकूण १,४७,०९,१५० रुपये शेअर मार्केटमध्ये संबंधित कंपनीमार्फत गुंतवले. आरोप असलेल्या संचालकांसह इतर आरोपींनी बनावट कागदपत्राद्वारे तक्रारदाराचे शेअर्स कमी दराने त्यांच्या नातेवाइकांना विकून ७९,६२,०४९ रुपयांची फसवणूक केली. तसेच गुंतवलेली रक्कमही परत न दिल्याचा आरोप आहे.

प्रकरण काय?
 कागदपत्रानुसार, तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील व्यवहार २०१९ ते २०२० पर्यंत सुरळीत होते. २०१९ पासून त्यांच्यात वाद सुरू झाले. तसेच, नावे सारखीच असल्याने जे भाग विकले ते नातेवाइकांनाच विकले हे ग्राह्य धरले जाऊ शकत नाही असे नमूद 
करण्यात आले. 

 नॅशनल स्टॉक एक्स्चेंज गुंतवणूकदार तक्रार निवारण समितीने या प्रकरणाचा निर्णय घेत अर्थ वृद्धीला तक्रारदाराने गमावलेली रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शेअर मार्केटमधील शेअर्सच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतात आणि तक्रारदारासह गुंतवणूकदारांना नफा आणि तोटा यासाठीही तयार राहावे लागेल. शेअर्सच्या व्यवसायात फक्त नफा होईल, तोटा होणार नाही अशी हमी आरोपीसह कोणीही देऊ शकत नाही असेही निरीक्षण जैन यांच्या जामीन अर्जावेळी नोंदविण्यात आले आहे.
     याप्रकरणाचा तपास आधीच पूर्ण झाला आहे. तसेच, आरोपी कोर्टाने घातलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करण्यास तयार असल्याने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जैन यांच्यासह तिन्ही संचालकांना जामीन मंजूर करण्यात 
आला आहे.

 

Web Title: share trading fraud; Bail to 3 directors, further investigation by Vileparle police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.