तिने मागितली केक कापायला सूरी अन् वेटरने केला हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:03 PM2019-01-07T18:03:13+5:302019-01-07T18:06:17+5:30

निशांत गौडा (२३) असं अटक आरोपीचं नाव आहे. फरझाना मीरत (३०) ही एनआरआय महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असताना ही घटना घडली.

She asked her to cut the cake and the waiter did the attack | तिने मागितली केक कापायला सूरी अन् वेटरने केला हल्ला  

तिने मागितली केक कापायला सूरी अन् वेटरने केला हल्ला  

googlenewsNext
ठळक मुद्देफरझाना मीरत (३०) ही एनआरआय महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असताना ही घटना घडली.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भा. दं. वि. ३२६ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.निशांत गौडा (२३) असं अटक आरोपीचं नाव आहे.

मुंबई - केक कापण्यासाठी एनआरआय महिलेने सुरी मागितल्यानंतर संतापलेल्या वेटरने महिलेवर सुरीने हल्ला केला. अंधेरी येथील जे. बी. नगर परिसरातील हॉटेलमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. निशांत गौडा (२३) असं अटक आरोपीचं नाव आहे. फरझाना मीरत (३०) ही एनआरआय महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असताना ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरझाना मीरत ही महिला रविवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आली. ती गुजरात येथे लग्नासाठी जाणार होती. रविवारी ती आईसोबत जे. बी. नगर येथील हॉटेलमध्ये गेली होती. मीरतच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तिने वेगवेगळया खाद्य पदार्थांसह केकचीही ऑर्डर दिली होती. त्यासाठी तिने सहा ते सातवेळा वेटरला बोलावले.

निशांत गौडा ऑर्डरप्रमाणे केक घेऊन आला. मात्र, त्याने सुरी आणली नाही. त्यामुळे तिने त्याल पुन्हा सुरी आणण्यासाठी पाठवले. फरझानाची सुरी आणायला सांगण्याची जी पद्धत होती त्यावर निशांत प्रचंड संतापला होता. तो काही न बोलता गपचूप निघून गेला. सुरी घेऊन आल्यानंतर ती फरझानाच्या हातात देण्याऐवजी त्याने त्याच सुरीने तिच्यावर वार केला. यामध्ये फरझानाच्या गळयाला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भा. दं. वि. ३२६ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरझाना मीरत आणि तिच्या आईचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Web Title: She asked her to cut the cake and the waiter did the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.