Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:20 IST2022-03-07T17:11:12+5:302022-03-07T17:20:18+5:30
Dating App :त्रासलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याबाबत बोलला असता आरोपीने बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग...
राजधानी नवी दिल्लीत किन्नरने केलेले लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे. एका किन्नराने एका तरुणाशी डेटिंग ऍपच्या माध्यमातून मैत्री केली आणि त्यानंतर अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्रासलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याबाबत बोलला असता आरोपीने बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. पीडित तरुणाने धाडस दाखवत मेहरौली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन किन्नरांना अटक केली आहे.
दक्षिण जिल्हा दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी हर्ष वर्धन यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने तक्रार केली. त्या तक्रारीत त्याने काही दिवसांपूर्वी डेटिंग अॅपद्वारे हिना खान नावाच्या मुलीशी त्याचे संभाषण सुरू झाले. हे संभाषण बरेच दिवस चालू राहिले, त्यानंतर तरुणीने त्याला दक्षिण दिल्लीतील सैदुल्ला जब येथील फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले. येथे किन्नर हिना खान आणखी एक सहकारी अश्मायरा इब्राहिमसोबत उपस्थित होती. दोघांनीही या तरुणाला फ्लॅटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद केला. यानंतर त्यांच्या खिशातून एक हजार रुपये, गळ्यातील सोनसाखळी, फोन-पेमधून सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर पीडितेचे कपडे बळजबरीने काढून तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असे नमूद केले आहे.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि पीडितेसोबत गुन्हा घडलेल्या फ्लॅटवर छापा टाकून दोन्ही किन्नरांना पकडले. तपासात आरोपी किन्नरांनी अशाच प्रकारे अनेक तरुणांना लुबाडल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या या अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याच्या मोडस ऑपरेंडीमुळे घाबरून कोणी तक्रारही केली नाही. आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.