प्रियकराला रात्रीच बोलविले, संबंध ठेवतानाच गळा आवळला; धक्कादायक घटनेने पोलिसही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:18 IST2025-02-03T14:17:48+5:302025-02-03T14:18:09+5:30
अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिलेला पोलिसांनी तुरुंगात पाठविले असून अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या प्रकाराने पोलिसही हादरले आहेत.

प्रियकराला रात्रीच बोलविले, संबंध ठेवतानाच गळा आवळला; धक्कादायक घटनेने पोलिसही...
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक धक्कादायक अनैतिक संबंधांतून खुनाची घटना उघडकीस आली आहे. प्रियकराला त्याच्या सासरहून बोलवून घेत विवाहित असलेल्या प्रेयसीने अख्खी रात्र त्याच्यासोबत घालविली. संबंध ठेवत असतानाच त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिलेला पोलिसांनी तुरुंगात पाठविले असून अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या प्रकाराने पोलिसही हादरले आहेत.
भोजीपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील एका तरुणाने बुधवारी आपल्या पत्नीला माहेरी नेले होते. तिथे तिला सोडून तो प्रेयसीने बोलविल्याने परत घरी आला होता. सकाळी त्याचा मृतदेह पायऱ्यांवर पडलेला आढळला. पोलिसांनी तरुणाच्या मोबाईलचे सीडीआर काढले तेव्हा सर्व गोष्टी उघड झाल्या.
पोलिसांनी सीडीआरच्या आधारे त्याच्याच गावातील एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने पोलिसांना काही नीट उत्तरे दिली नाहीत. परंतू, खाक्या दााखविताच तिने घडाघडा सर्वकाही सांगून टाकले.
ही महिला जरदोसी काम करायची. यामुळे तिचे या तरुणाच्या घरी येणे-जाणे होते. तो देखील हेच काम करायचा. यामुळे यांच्यात जवळीक वाढली. गेल्या दोन महिन्यांत त्यांच्यात शरीर संबंधही प्रस्थापित होऊ लागले. फोनवर अश्लील बोलणेही वाढू लागले. ते रेकॉर्डिंग करून या तरुणाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
हे रेकॉर्डिंग तुझ्या पतीला पाठवून देईन अशी धमकी तो देऊ लागला. यामुळे ज्या दिवशी हा तरुण पत्नीला माहेरी घेऊन गेला तेव्हा त्याला तिने रात्री एकांतात भेटण्याचे आमिष दाखविले. यामुळे तो तिथून परत आला. त्याच्याच घरी जात या महिलेने त्याच्यासोबत ती रात्र घालविली. शरीरसंबंध ठेवत असतानाच त्याचा गळा आवळला. यानंतर तो मृत झाल्याचे पाहून त्याच्या ओढत नेत पायऱ्यांवरून ढकलून दिले.