पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:22 PM2020-06-15T16:22:52+5:302020-06-15T16:26:05+5:30
ती पाकिस्तानातील अनेक हँडलर्ससह २६ / ११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या देखील संपर्कात होती.
नवी दिल्ली - भारतातील महिला हेरगिरी करणाऱ्यांचे रॅकेटचा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) पर्दाफाश केला आहे. NIAला एका 22 वर्षीय लष्कर-ए-तोयबा (एलईटी) हँडलरची १० दिवसांची कस्टडी मिळाली आहे. तानिया परवीन असं या महिला हेरगिरी करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. ती पाकिस्तानातील अनेक हँडलर्ससह २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या देखील संपर्कात होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेली तानिया परवीन अनेक सिमकार्डचा वापर करत पाकिस्तानमधील इतर हँडलरच्या संपर्कात होती. तिने भारतीय सिम कार्ड देखील वाटले होते आणि ती व्हॉट्स अॅप ग्रुप, फेसबुकद्वारे संपर्क बनविण्याचे काम करीत होती. प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्याही ती संपर्कात होती. ISI तिचा वापर अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी करत आहे. कोलकाता कार्यालयात दहशतवादविरोधी एजन्सीचे पथक तिची चौकशी करणार आहे. पाकिस्तानातील बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या महिला हेरांवर NIA करडी नजर ठेवून आहेत.
स्पेशल टास्क फोर्सने कोलकाताच्या मौलाना आझाद कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या तानिया परवीनच्या पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेजवळील बदुरिया येथून मुसक्या आवळल्या. तानियावर वर्षभर पाळत ठेवल्यानंतर कारवाई करण्यात आल्याची माहिती NIA ने दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...