शिजानच्या जामिनावर आज वसईत सुनावणी; जामीन मिळणार की काेठडी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:38 AM2023-02-23T06:38:31+5:302023-02-23T06:38:46+5:30
सत्र न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर शिजानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता
नालासोपारा : टीव्ही मालिका ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ची अभिनेत्री तुनीषा शर्मा तिच्या आत्महत्ये प्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून तिचा माजी प्रियकर आणि सहकलाकार शिजान खान अटकेत आहे. गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत शिजानला जामीन मिळणार की आणखी काही काळ तुरुंगातच राहावे लागणार, याकडे लक्ष लागले आहे.
सत्र न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर शिजानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र आता तेथून याचिका मागे घेत पुन्हा वसई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले असून पोलिस तपास पूर्ण झाल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले.
शिजानविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्र
वालीव पोलिसांनी अलीकडेच शिजान खानविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल केलेले आहे. यामध्ये खानवर भारतीय दंड संहिता कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागू केलेल्या कलमांतर्गत शिक्षेमध्ये दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.