Prakash Surve: प्रकाश सुर्वेंचा शिंदे गटाच्या महिला नेत्यासोबत व्हिडीओ मॉर्फ; व्हायरल करणारे दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:58 PM2023-03-12T12:58:18+5:302023-03-12T12:59:33+5:30
शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला होता.
मागाठाणेमध्ये शनिवारी सायंकाळी शिंदे गट शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन झाले. या रॅलीमध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या रॅलीतील म्हात्रे आणि सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला होता. मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता.
ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ अपलोड करून व्हायरल केल्याचं सांगत या प्रकरणी विनयभंगासारखा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुर्वे यांच्या मुलाने केली होती.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे.
आज हे व्हिडीओ व्हायरल करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचं नातं असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कुणाचं डोकं आहे आणि कोण करतंय याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे.
दीड वर्षांपूर्वीही...
सुमारे दीड वर्षांपूर्वी देखील सुर्वे हे सायबर क्राईमचा शिकार बनले होते. ‘हॅलो, हाऊ आर यू, क्या हुवा जी’ म्हणत मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना अनोळखी व्यक्तीने सेक्सटॉर्शन कॉल करत ५ हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास त्यांचा मॉर्फ अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली होती.