Shiv Sena Leader Firing Case: बंदुकीच्या परवान्यासाठी खटाटोप? शिवसेना उपशाखाप्रमुखाने स्वत:वरच गोळीबाराचा कट रचला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 07:45 PM2021-12-05T19:45:40+5:302021-12-05T19:46:23+5:30

Shiv Sena leader Firing Case: पालघरच्या सोनोपंत दांडेकर-खारे कुरण रस्त्यावरून जात असताना काही अज्ञातांनी फायरिंग करून जीवघेणा हल्ला केल्याची फिर्याद राजेश घुडे ह्यांनी पालघर पोलिसात दिली होती.

Shiv Sena Firing Case: Shiv Sena sub-branch chief plots to shoot himself; Discuss this reason | Shiv Sena Leader Firing Case: बंदुकीच्या परवान्यासाठी खटाटोप? शिवसेना उपशाखाप्रमुखाने स्वत:वरच गोळीबाराचा कट रचला

Shiv Sena Leader Firing Case: बंदुकीच्या परवान्यासाठी खटाटोप? शिवसेना उपशाखाप्रमुखाने स्वत:वरच गोळीबाराचा कट रचला

googlenewsNext

- हितेंन नाईक 
लोकमत न्युज नेटवर्क 
पालघर: आपल्यावर फायरिंग करून जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याप्रकरणी पालघर शहरातील शिवसेनेचा उपशाखा प्रमुख व बॅनर व्यवसायिक राजेश घुडे उर्फ बाळा याला पालघर पोलिसांनी अटक केली. 

पालघर न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आपल्यावर पालघरच्या सोनोपंत दांडेकर-खारे कुरण रस्त्यावरून जात असताना काही अज्ञातांनी फायरिंग करून जीवघेणा हल्ला केल्याची फिर्याद राजेश घुडे ह्यांनी पालघर पोलिसात दिली होती. पोलिसांनी ह्या प्रकरणाचा चोहोबाजूने तपास करायला सुरुवात केली होती. परंतु आरोपी निष्पन्न होत न्हवता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी तपास चक्रे अधिक गतीने फिरवून पुरावे गोळा करायला सुरुवात केल्यानंतर घुडे याने स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याचे समोर आले. 

पालघर पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच हा कट रचला असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचे पालघरच्या पोलीस उप अधिक्षिका यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी म्हणून त्याला आज न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. आपल्या जीविताला धोका असल्याचे भासवून नंतर बंदुकीचा परवाना मिळू शकतो यासाठी आरोपीने हा खटाटोप केल्याची चर्चा पालघरमध्ये सुरू आहे.

Web Title: Shiv Sena Firing Case: Shiv Sena sub-branch chief plots to shoot himself; Discuss this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.