शिवसेना खासदाराच्या गाडीने हरिणाला चिरडले; चालकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 03:14 PM2019-12-02T15:14:55+5:302019-12-02T15:16:48+5:30

जखमी हरिणाला तातडीने एसजीएनपी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

Shiv Sena MP's car crushed; The driver was arrested | शिवसेना खासदाराच्या गाडीने हरिणाला चिरडले; चालकाला अटक 

शिवसेना खासदाराच्या गाडीने हरिणाला चिरडले; चालकाला अटक 

Next
ठळक मुद्दे एसयूव्ही कारने एसजीएनपीच्याआत त्रिमूर्ती स्टेशनलगतचा रस्ता ओलांडणार्‍या हरिणीला गाडीखाली चिरडून ठार मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.बेजबाबदारपणे बेधडक वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.आम्ही पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहोत आणि लवकरच मोहीम सुरू करण्याचा विचार करीत आहोत,” अन्वर पुढे म्हणाले.

मुंबई - शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या एसयूव्ही चारचाकी वाहनाने बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) हरिणाला चिरडले आहे. मुख्य वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक अन्वर अहमद म्हणाले की, "बेजबाबदारपणे बेधडक वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे." एसजीएनपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावित यांच्या नावे नोंदवलेल्या एसयूव्ही कारने एसजीएनपीच्याआत त्रिमूर्ती स्टेशनलगतचा रस्ता ओलांडणार्‍या हरिणीला गाडीखाली चिरडून ठार मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

एसजीएनपीच्या अन्य सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "ही घटना सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घडली. एसटीएनपी मुख्य गेटकडे कार जात असताना गांधी टेकडीजवळ हरीण गाडीखाली आलं. चालकाने आम्हाला अपघाताची माहिती मुख्य प्रवेशद्वारापाशी दिली. तेव्हा जखमी हरिणाला तातडीने एसजीएनपी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं."

वाहन ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक अन्वर अहमद म्हणाले, “आम्ही वाहनचालकांना एसजीएनपीमध्ये वाहन चालक कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करू इच्छितो. आम्ही पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहोत आणि लवकरच मोहीम सुरू करण्याचा विचार करीत आहोत,” अन्वर पुढे म्हणाले.

Web Title: Shiv Sena MP's car crushed; The driver was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.