शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रताप! सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजप आमदारसोबत सूनेने घेतली पोलीस उपायुक्तांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 08:25 PM2021-05-29T20:25:20+5:302021-05-29T20:44:09+5:30
Shiv Sena office bearer spat on daughter in law's face : या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच सुनेने सादर करीत भाजप आमदारांच्यासोबत पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.
कल्याण-कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक याने त्याच्या सूनेच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार केला आहे. तिला मारहाण करुन शिविगाळ केली आहे. या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच सुनेने सादर करीत भाजप आमदारांच्यासोबतपोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे. सासऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात राहणाऱ्या हर्षदा पाटील या शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या सूनबाई आहेत. सासरे एकनाथ हे सूनेला वारंवार त्रस देतात. त्यांना मारहाण करता. शिवीगाळ करतात. इतकेच नाही तर हर्षदा यांच्या मुलीच्या अंगावरही धावून जातात. एकनाथ यांनी हर्षदा यांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार केला आहे. हर्षदा यांनी या घटनेचा मोबाईल व्हीडीओ पुरव्यासाठी तयार केला होता. सास:याकडून कशा प्रकारे त्यांना त्रस आहे यासाठी हा व्हीडीओ त्यांनी तयार केला. सास:याकडून सुरु असलेल्या त्रसाची माहिती त्यांनी शिवसेनेच्या नेते मंडळींनी सांगण्याचा प्रकार केला. त्यांच्याकडून एकनाथ यांच्या विरोधात कोणतीही तक्रार ऐकून घेतली जात नाही. पोलिसही हर्षदा यांच्या तक्रारीला दाद देत नाही. अखेरी हर्षदा यांनी डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. आमदार चव्हाण यांनी या प्रकरणी भाजप नगरसेविका रविना माळी यांच्यासह हर्षदा यांना सोबत घेऊन पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे हा प्रकार सांगितला. हर्षदा यांनी सासऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिस उपायुक्तांकडे केली आहे. पोलिस उपायुक्तांनी या व्हीडीओची सत्यता पडताळून चौकशी केली जाईल. चौकशी अंती कारवाई करण्यात येईल.
बेदम मारहाणीनेच पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू; ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हाhttps://t.co/FbOANn3oyl
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021
दरम्यान एकनाथ पाटील यांच्याकडे या विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सून ज्या व्हीडीओबाबत सांगत आहे. तो व्हीडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे. आत्ता आमच्यात कोणताही वाद नाही. भाजपचे पदाधिकारी हे आमच्या घरगूती वादाचा फायदा घेऊन भाजपने माङया बदनामीचा डाव आखला आहे. सूनेला हाताशी धरून भाजपकडून माझी बदनामी सुरु आहे.