ठाण्यात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्यांकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 05:19 AM2023-03-01T05:19:51+5:302023-03-01T05:20:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथील आपल्या घरी जातांना काही फेरीवाल्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथील आपल्या घरी जातांना काही फेरीवाल्यांनी चॉपरसारख्या हत्याराने डोक्यावर वार करुन हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परदेशी यांचा जांभळी नाका येथे फेरीचा व्यवसाय होता. त्यांचा काही फेरीवाल्यांशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. हाच वाद रविवारी पुन्हा उफाळून आला. ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जात असतांना त्यांच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांना तातडीने ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप्र प्राथमिक चौकशी सुरु असल्याने कोणालाही अटक केली नसल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले. चॉपरने हल्ला करणाºयांचे सीसीटीव्हीतील चित्रणही पोलिसांच्या हाती लागले असून यामध्ये तिघांचे चेहरे दिसत असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अद्याप कोणालाही अटक केली नसून याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली.