शिवाजीराव भोसले बँकेत आणखी ८० कोटींचा घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 08:16 PM2020-03-02T20:16:17+5:302020-03-02T20:21:08+5:30

बँकेवर आर्थिक व्यवहार करण्याचे निर्बंध घातल्यानंतरही बँकेने तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढले.

Shivajirao Bhosale Bank reveals another Rs 80 crore scam | शिवाजीराव भोसले बँकेत आणखी ८० कोटींचा घोटाळा उघड

शिवाजीराव भोसले बँकेत आणखी ८० कोटींचा घोटाळा उघड

Next
ठळक मुद्देगैरशिस्त पाहून रिझर्व्ह बँकेने बँकेवर लादले होते आर्थिक निर्बध

पुणे : एनपीए (अनुत्पादक कर्ज) दिसू नये, म्हणून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत तब्बल ८० कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट दिल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच बँकेवर आर्थिक व्यवहार करण्याचे निर्बंध घातल्यानंतरही बँकेने तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले,सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली आहे. या चौघांना विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. भोसले हे बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना, जाधव संचालक होते. तसेच पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशेब तपासनीस होते. त्या काळात ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, सध्या या चौघांकडे चौकशी करण्यात येत आहे़ आरोपींची बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी माहिती घेतली जात आहे. आरोपींनी या रक्कमेचा वापर कशाकरीता केला याची माहिती घेण्यात येत आहे. या बँकेच्या आणखी एका संचालकाचे नाव समोर आले आहे.
बँक एनपीए दिसू नये, म्हणून बँकेने तब्बल ८० कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट दिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या भावाला हे कॅश क्रेडिट देण्यात आले आहे. त्यासाठी २३ धनादेशांचा वापर
करण्यात आला होता. बँकेची आर्थिक गैरशिस्त पाहून रिझर्व्ह बँकेने ६ मे २०१९ रोजी आदेश काढून बँकेवर आर्थिक निर्बध लादले होते. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना केवळ १ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती असे असताना या निर्बंधानंतर बँकेतून तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे आढळून असल्याचे कदम
यांनी सांगितले.

..................................

लेखापरीक्षकांची होणार चौकशी

शिवाजीराव भोसले बँकेत इतकी अनियमितता असताना मागील लेखा परिक्षकांना ती कशी दिसून आली नाही़ त्यांनी त्याबाबत कोणत्या सूचना दिल्या होत्या. आर्थिक बाबींच्या अनियमिततेबाबत काही इशारा दिला होता का, याची माहिती घेतली जात असून या लेखा परिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Web Title: Shivajirao Bhosale Bank reveals another Rs 80 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.