सासवड येथे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 10:00 PM2018-10-20T22:00:33+5:302018-10-20T22:04:32+5:30

पुरंदर तालुका शिवसेनाउपप्रमुखांनी साथीदारांसह सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश पोपट यादव यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली.

Shivsena's deputy chief of the taluka of Saswad beat up to police | सासवड येथे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

सासवड येथे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडीमारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमीसरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सासवड : सासवड(ता.पुरंदर) येथील फळ मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ पुरंदर तालुका शिवसेनाउपप्रमुखांनी साथीदारांसह सासवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रकाश पोपट यादव यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी तीन आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आाहे. विश्वास बबन काटकर (वय ४० रा.सुपे खुर्द ता. पुरंदर )आणि राजेंद्र बाळकृष्ण पिलाने(वय ४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई यादव यांना ग्रामीण रुग्णालय सासवड येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
       याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यादव हे सासवड शहरातील फळ  मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी सुरळीत करत असतानाकाटकर व   पिलाने आणि यांच्यासोबत असणारा अजून एक अनोळखी व्यक्ती अशा तिघा आरोपींनी अचानक मारुती ओमनी कार क्रमांक (एमएच-१२  डीएम.२२७०)मध्ये घुसवली. चारचाकी राजेंद्र पिलाने चालवत होता. पोलीस कर्मचारी यादव व माने यांनी आरोपीस वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी यादव व माने यांनी केलेल्या इशाºयाकडे दुर्लक्ष करत गाडीतून खाली उतरून पोलिसांना शिवीगाळ करत तीनही आरोपींना पोलीस कर्मचारी यादव यांना बेदम मारहाण केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजविण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांनी या भागातील सर्व दुकाने बंद केली.या मारहाणीत यादव गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर प्रकरणातील आरोपी विश्वास काटकर हा शिवसेना पुरंदर तालुका उपप्रमुख या पदावर आहे. या प्रकरणी तीनही आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल होवू नये म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे स्वीय सहायक माणिक निंबाळकर यांनी पोलिसांवर प्रचंड दबाव आणला. परंतु, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Shivsena's deputy chief of the taluka of Saswad beat up to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.