युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची पुण्यात हत्या; कसबा पेठेमध्ये तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:02 AM2020-10-02T09:02:10+5:302020-10-02T09:04:28+5:30
Dipak Maratkar murder in pune: राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवसेना युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर ५ ते ६ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने शहराच्या मध्य वस्तीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे़
पार्थ पवार विविध विषयांवर ट्विट करून राष्ट्रवादीला अडचणीत आणत आहेत. गेल्या वेळी शरद पवार यांनी पार्थबाबत भूमिका स्पष्ट केली होती. आता मराठा आरक्षणावरील ट्विटवरून अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.https://t.co/ujuMbefNlP@NCPspeaks@AjitPawarSpeaks
— Lokmat (@MiLOKMAT) October 2, 2020
दीपक विजय मारटकर हे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेवण करुन घराबाहेर बसले होते. यावेळी मोटारसायकलवरुन ५ ते ६ जण आले. त्यांनी तीक्ष्ण हत्याराने दीपक यांच्यावर सपासप वार केले व पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना विजय घाटावर जात आदरांजली वाहिली. https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 2, 2020
माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे दीपक मारटकर हे पुत्र होत.
राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दीपक मारटकर उभे होते़. त्यांच्याविरोधात अश्विनी कांबळे याही उभ्या होत्या. शिवसेनेतील एक नेते महेंद्र सराफ हेही तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना शिवसेनेचे तिकीट मिळाले नाही. याबाबत सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले की, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सनी कोलते व इतरांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना संशयितांची नावे समजली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.