पोलीस अधिकारी बनण्याचं होतं स्वप्न; बारावीत शिकणाऱ्या अंकिताला जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:20 PM2022-08-29T18:20:43+5:302022-08-29T18:20:49+5:30
अंकिताचा छोटा भाऊ सहावीत शिक्षण घेतोय. दुमका येथे कुटुंबासह अंकिता राहते. ज्या मुलीनं लहानपणीच आईला गमावलं
झारखंडच्या दुमका येथे एका माथेफिरूने बारावीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळलं. या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर हिंदु संघटनांनी लव जिहादचा आरोप केला आहे. वाढत्या दबावामुळे झारखंड सरकारने गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
१७ वर्षीय अंकिता सिंह गर्ल्स हायस्कूलमध्ये १२ वीचं शिक्षण घेत होती. खर्च भागवण्यासाठी ती स्वत: ट्यूशन क्लास घेत दर महिन्याला १ हजार रुपये कमवत होती. अंकिताला मोठं होऊन पोलीस अधिकारी बनायचं स्वप्न होतं. अंकिताच्या वडिलांची दिवसाची कमाई २०० रुपये होती. अंकिताच्या आईचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. आईच्या उपचारासाठी घरची सर्व जमीन, संपत्ती विकण्याची वेळ कुटुंबावर आली.
अंकिताचा छोटा भाऊ सहावीत शिक्षण घेतोय. दुमका येथे कुटुंबासह अंकिता राहते. ज्या मुलीनं लहानपणीच आईला गमावलं. त्या मुलीला घरात एकटी असताना जिवंत जाळून मारण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली. अंकिताला आरोपी शाहरुखचा रात्री ९ वाजता फोन आला. शाहरुखनं त्याच्याशी बोलण्याचा आणि कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु अंकिताने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शाहरुखने तिला धमकी दिली. पहाटे ४ वाजता अंकिताच्या घरी शाहरुख पोहचला. खिडकीच्या मार्गे तो अंकिताच्या रुममध्ये गेला आणि पेट्रोल टाकून तिला जाळलं.
जळालेल्या अवस्थेतही अंकिताने स्वत:वर पाण्याची बादली ओतली. परंतु आग विझली नाही. त्यानंतर घरातील सगळे जागे झाल्यानंतर चादर टाकून आग विझवण्यात आली. अंकिताला जखमी अवस्थेत दुमका मेडिकाल कॉलेजमध्ये भरती केले. अंकिताच्या जबाबानंतर शाहरुखचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतर शाहरुखने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. अंकिताला जाळून मारणारा शाहरुख २३ वर्षांचा असून त्याने केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. शाहरुख दुमका येथील एका कॉलनीत राहतो. तो काम करायचा. गेल्या दीड वर्षांपासून तो अंकिताला फॉलो करत होता. तो ड्रग्जही घेत असे. घटनेच्या रात्री शाहरुखसोबत त्याचा मित्र छोटू होता.