धक्कादायक! अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून भोंदू बाबाने केला 120 महिलांवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 09:29 AM2018-07-21T09:29:52+5:302018-07-21T09:30:36+5:30
भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे 120 महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हिसार (हरयाणा) - भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे 120 महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरणायातील टोहाना येथील बाबा बालकनाथ मंदिरात पुजारी असलेल्या अमरपुरी ऊर्फ बिल्लू याचा महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या बाबास बेड्या ठोकल्या. अधिक तपासादरम्यान या बाबाचे सुमारे 120 महिलांसोबत शारीरिक संबंध बनवतानाचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले.
अमरपुरी ऊर्फ बिल्लू हा प्रेतबाधा झाल्याचे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर तंत्रमंत्रांच्या बहाण्याने तो महिलांना बेशुद्ध करणारे औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार करत असे. मग अशा महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असे, तसेच त्यांना अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अमरपुरीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे.
Haryana: Baba Amarpuri, a Mahant at Baba Balaknath Temple in Fatehabad's Tohana, was nabbed by police y'day after videos of him allegedly raping women surfaced online. Police say 'We filed a case & started probe. His premises were also raided & we seized some suspicious articles' pic.twitter.com/RGw7HIWwdZ
— ANI (@ANI) July 21, 2018
सुमारे 100 हून अधिक महिलांच्या अब्रुशी खेळणारा हा भोंदू बाबा एकेकाळी जिलेबी विकण्याचे दुकान चालवत होता. त्याचे खरे नाव अमरवीर होते. तसेच तो 20 वर्षांपूर्वी पंजाबमधील मानसा येथून हरयाणातील टोहाणा येथे आला होता.