धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:50 AM2020-06-10T09:50:51+5:302020-06-10T09:53:34+5:30

बिबवेवाडीतील मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Shocking! 13-year-old boy commits suicide by not allowing to watch cartoons in Pune | धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार

Next

पुणे : कार्टुन पाहू न दिल्याच्या रागातून १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी येथे घडला आहे. या मुलाने घरातील वरच्या खोलीत जाऊन स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.


बिबवेवाडीतील मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १३ वर्षांच्या मुलाने नुकताच ७ वीच्या वर्गात प्रवेश केला होता. मंगळवारी सकाळपासून तो कार्टुन पहात बसला होता. त्यामुळे त्याच्या घराच्यांनी त्याला अनेक वेळा कार्टुन पाहून नको, असे सांगितले. तरी त्याने कोणाचे ऐकले नाही. शेवटी टीव्ही बंद करुन घरातले सर्व जण बाहेर गेले. टीव्ही बंद केल्याने रागात हा मुलगा वरच्या खोलीत गेला. तेथे त्याने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 


घरातील लोक परतल्यानंतर त्यांनी हा मुलगा बराच वेळ खाली आला नाही, म्हणून त्याला पाहण्यासाठी गेले असताना त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कार्टुन पाहू न दिल्याने मुलाने केलेल्या आत्महत्येची माहिती परिसरात समजताच लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग

Web Title: Shocking! 13-year-old boy commits suicide by not allowing to watch cartoons in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.