धक्कादायक! बकऱ्याच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोनजण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 06:09 PM2019-05-13T18:09:36+5:302019-05-13T18:12:01+5:30
युनूस खान, महोम्मद जलील रेहमान अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई - घाटकोपर परिसरात एका बकऱ्याने दिलेल्या धडकेमुळे १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आता बकऱ्याला परिसरात मोकाट सोडणाऱ्या दोघांविरोधात पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. युनूस खान, महोम्मद जलील रेहमान अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
विक्रोळीच्या इस्लामपूर परिसरात राहणारा सिरताज लियातक शेख (१३) हा २९ एप्रिल रोजी फिरत होता. यावेळी अचानक एका बकऱ्याने येऊन त्याच्या छातीवर जोरदार धडक दिली. त्यानंतर सिरताज जागेवरच बेशुद्ध पडला. स्थानिकांनी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात ह्रदयाला गंभीर दुखापत झाल्यामुळे सिरताजचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर सिरताजच्या कुटुंबियांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून खान, रेहमान या दोघांना पोलिसांनी ३०४ (अ) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
मुंबई - बकऱ्याच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघांना अटकhttps://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2019