धक्कादायक! 15 वर्षांची बालिका बनली गर्भवती; आई-वडिलांसह चौघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:17 PM2023-04-01T22:17:42+5:302023-04-01T22:19:01+5:30
पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात पोक्सोसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग भिलारे -
वाई : अल्पवयीन असूनही आत्याच्या मुलाशी आई-वडिलांनी लग्न लावून दिलं. पतीनं बालिकेसोबत वारंवार शरीर संबंध ठेवल्यानं १५ वर्ष ९ महिन्यांची बालिका गर्भवती असल्याची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात पोक्सोसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावात एक अल्पवयीन विवाहिता गर्भवती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महिला पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता मुलगी गर्भवती असल्याची माहिती खरी ठरली. पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचारी सुजाता मोकाशी यांनी त्या विवाहितेचा पती, मुलीचे आई-वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडत मुलीचं वय कमी असल्याचं माहिती असतानाही तिच्या आत्याच्या मुलासोबत घरातल्यांनी लग्न लावून दिलं. बालविवाह झाल्यानंतर पतीनं तिच्याशी वारंवार मे २०२२ पासून अत्याचार केला. त्यामुळे ती बालविवाहिता गर्भवती राहिली. त्यावरून चौघांविरुद्ध पोक्सो, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.