धक्कादायक! वसईत 4 लहान मुलांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 07:11 PM2019-05-11T19:11:12+5:302019-05-11T19:13:08+5:30

लहान मुले अपहरण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची डोकेदुःखी

Shocking 4 children kidnapped in Vasai | धक्कादायक! वसईत 4 लहान मुलांचे अपहरण

धक्कादायक! वसईत 4 लहान मुलांचे अपहरण

Next
ठळक मुद्देअलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला.

 

नालासोपारा - वसई तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी पाठोपाठ लहान मुलांचे अपहरणाचे प्रकार थांबता थांबेना झाले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण अधिकच वाढू लागला आहे. तालुक्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी पाठोपाठ आता लहान मुले पळवण्याचे किंवा ठरविण्याचे प्रमाण वाढले झाली आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र,  ते सापडले नसल्याने शेवटी घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन कोणीतरी, कसले तरी आमिष दाखवून मुलांना पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनीअपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरामधील रस्त्यावरील सिग्नलवर भिका मागण्यांसाठी अशा छोट्या मुलांना प्रचंड मागणी आहे. राज्यातून आलेल्या कमी उत्पन गटातील कुटुंबाच्या मुलांना हमखास पळवून नेण्यात आल्याचे असंख्य प्रकार घडले आहे. एकंदरित मुलं पळवून नेऊन आणि स्वखुशीने गरिबीच्या चटक्यामुळे मुलं विक्रीचा गोरखधंदा म्हणजे पोलिसांना एक आव्हानच ठरले आहे.

नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा ओमनगर येथील रोझ अपार्टमेंटमधील गाळा नंबर 3 मध्ये राहणाऱ्या विभागात राहणाऱ्या मनिता अमरजित कौशल (39) यांचा मुलगा अरमान (8) हा मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरातून कोणीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण तो सापडलाच नाही. शेवटी तुळींज पोलीस ठाण्याला जाऊन मुलगा सापडत नसल्याची तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील राम रहीम चाळीच्या बाजूला राहणारे रिंकू उर्फ राजूमिश्रि रामप्यारे शर्मा (39) यांचा मुलगा अनबुरा (13) हा शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूला खेळण्यासाठी गेला होता पण तो अद्यापपर्यंत परतलाच नाही. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण न भेटल्याने शेवटी मंगळवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विरार पूर्वेकडील चंदनसार येथील आरटीओ ऑफिससमोरील चाळीत रूम नंबर 9 मध्ये राहणाऱ्या दीपा संजय चौधरी (26) यांची मुलगी ईशानी (3.5 वर्ष) ही सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता घराच्या बाहेर खेळत असताना तिला पूस लावून अपहरण केले आहे. घरच्यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तर दुसरीकडे विरार पूर्वेकडील वीर सावरकर रोडवरील साइराज अपार्टमेंटमध्ये रूम नंबर 202 मध्ये राहणाऱ्या संतु कांबळे (48) यांची मुलगी स्नेहा (17) हिचेही आमिष व पूस लावून अपहरण केले आहे.

Web Title: Shocking 4 children kidnapped in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.