धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:39 PM2022-03-31T21:39:30+5:302022-03-31T21:39:51+5:30

Murder Case : हात-पाय बांधून या तरुणाला जिवंत नाल्यात फेकून दिल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट घेत आहेत.

Shocking! 6 murders in 10 days; missing boy's deadbody found in nallah | धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला

धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला

Next

उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात पोलिसांना गुन्हेगारांवर लगाम घालता येत नाहीय. कानपूरमध्ये गेल्या 10 दिवसांत 6 हत्या झाल्या आहेत. आज पुन्हा एका तरुणाचा मृतदेह नाल्यात आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते. काल संध्याकाळपासून तरुण बेपत्ता होता. हात-पाय बांधून या तरुणाला जिवंत नाल्यात फेकून दिल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील बारा भागातील काची बस्ती येथे राहणारा श्याम बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. तो घरून दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळलं नाही. गुरुवारी सकाळी त्याचा हातपाय बांधलेला मृतदेह नाल्यात आढळून आला. श्याम हा रायबरेलीचा रहिवासी होता. त्याचा भाऊ विवेक सांगतो की, जेव्हा त्याने संध्याकाळी त्याला पाहिले तेव्हा त्याला काही जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर चोरीचा आरोपही होता. त्याची हत्या कोणी केली हे कळू शकलेले नाही.

शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाईल
त्याचवेळी, याप्रकरणी एडीसीपी मनीष सोनकर यांनी सांगितले की, तरुण सायंकाळपासून बेपत्ता होता. हात-पाय बांधलेला मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर लिहिण्यात येत आहे. कानपूरमध्ये गेल्या दहा दिवसांत सिसामळ, शिवराजपूर, नरवाल, सचेंडी आणि इतर अनेक भागात खुनाच्या 6 घटना घडल्या आहेत.

Web Title: Shocking! 6 murders in 10 days; missing boy's deadbody found in nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.