धक्कादायक! ८ वर्षीय बालकाला घरात बोलावून नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:09 PM2021-12-15T20:09:28+5:302021-12-15T20:10:17+5:30
Unnatural Sex : संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील शाळेसमोरील वडाच्या झाडाखाली १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान ८ वर्षीय बालक खेळत होता.
संग्रामपूर : वडाच्या झाडाखाली खेळत असलेल्या ८ वर्षीय बालकाला घरात बोलावून एका २५ वर्षीय नराधमाने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडीत बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील शाळेसमोरील वडाच्या झाडाखाली १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान ८ वर्षीय बालक खेळत होता. गावातीलच आरोपी रवींद्र उर्फ विकी निना ठाकरे याने पीडित बालकाला घरी नेले. पैशाचे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यान, मातेला बालकाच्या कपड्यावर रक्ताचे डाग दिसून आले. बालकाकडे अधिक चौकशी केली असता झालेला प्रकार त्याने आईला सांगितला. पीडित बालकाची आई, आत्या व मामा या तिघांनी आरोपीच्या घरी जाऊन याबाबत विचारणा केली. मात्र, आरोपीने हे कृत्य मी केले नसल्याचे सांगून पीडित बालकाच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली. बालकाचे वडील कामावरून घरी परतले.
संपूर्ण हकिकत ऐकून त्यांनी थेट तामगाव पोलीस स्टेशन गाठले. पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र उर्फ विकी निना ठाकरे याच्यावर भादंविसह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बालकाला शंभर रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी पीडित बालकाला वैद्यकीय तपासणीसाठी अकोला येथील रुग्णालयात पाठवले. आरोपीला अटक केली. पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे करीत आहेत.