धक्कादायक! शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकास एसीबीने केली अटक; राज्यातील पहिलाच गुन्हा

By पूनम अपराज | Published: February 28, 2019 07:39 PM2019-02-28T19:39:11+5:302019-02-28T19:48:35+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) कर प्रभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (४८) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. 

Shocking ACB claims arrest of clerk for demanding sexual satisfaction; First offense in the state | धक्कादायक! शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकास एसीबीने केली अटक; राज्यातील पहिलाच गुन्हा

धक्कादायक! शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिपिकास एसीबीने केली अटक; राज्यातील पहिलाच गुन्हा

Next
ठळक मुद्देपहिल्यांदा एसीबीने शरीरसुखासाठी मागणी करणाऱ्या भामट्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. च म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या लिपिकाला तक्रारदार महिलेने चांगलाच धडा शिकवला आहे. 

ठाणे - लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजवर राज्यभरात पैसे स्वरूपात लाच घेताना अनेक सापळे रचले आणि रंगेहाथ आरोपींना अटक केली. मात्र, पहिल्यांदा एसीबीने शरीरसुखासाठी मागणी करणाऱ्या भामट्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) कर प्रभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (४८) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. 

३० वर्षीय महिलेने राहत्या घराचे प्रलंबित मालमत्ता कर भरण्यास जप्ती वॉरंट बजावणी पूर्व अखेरची सूचना काढली होती. या नोटीस अनुषंगाने मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी व मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी लाचेच्या स्वरुपात लिपिक राजपूतने तक्रारदार महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीच्या २६ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची शहनिशा करून आज सुभाष मैदान येथील गार्डनमध्ये तक्रारदार हिस भेटण्यासाठी बोलावले असताना सापळा रचून राजपूतला एसीबीने ताब्यात घेतले. ही घटना आज १२.४५ वाजताच्या दरम्यान घडली. महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहेत. मात्र त्यांच्यावरील अत्याचार सुरूच आहेत. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी जुलै २०१७ पासून शरीरसुखाची मागणी हाही लाचेचाच प्रकार ठरणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील बदलांमुळे महिलांना संरक्षण मिळणार आहे. महिलांना वाईट हेतूने पाहणं, त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध जास्त वेळ थांबवून ठेवणे, एखाद्या शरीरसुखाची मागणी करणे अशा प्रकारातून शोषण सुरू असते. मात्र त्यांना पाठबळ मिळत नाही. तक्रार केलीच तर उलट दोष दिला जातो. एसीबीच्या कायद्यात 'अनड्यू अॅडव्हांटेज ऑफ एनी थिंग' असा नवा शब्द समाविष्ट केल्याने हा लाचेचाच गुन्हा ठरणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सापळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याला १ ते ३ वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. त्यामुळे लाच म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या लिपिकाला तक्रारदार महिलेने चांगलाच धडा शिकवला आहे. 

Web Title: Shocking ACB claims arrest of clerk for demanding sexual satisfaction; First offense in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.