Holi Accident: धक्कादायक! होळी खेळून अंघोळीला बाथरुममध्ये एकत्र गेले पती-पत्नी; दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:19 AM2023-03-09T08:19:15+5:302023-03-09T08:20:05+5:30

खूप वेळ झाला तरी दोघे बाहेर न आल्याने मुलांनी वरती जाऊन बाथरुमचा दरवाजा उघडला असता दोघेही विवस्त्रावस्थेत निपचित पडलेले दिसले.

Shocking! After playing Holi, husband and wife went to bath together in the bathroom; Death of both due to gas geyser | Holi Accident: धक्कादायक! होळी खेळून अंघोळीला बाथरुममध्ये एकत्र गेले पती-पत्नी; दोघांचाही मृत्यू

Holi Accident: धक्कादायक! होळी खेळून अंघोळीला बाथरुममध्ये एकत्र गेले पती-पत्नी; दोघांचाही मृत्यू

googlenewsNext

गाझियाबाद: गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अग्रसेन विहारमध्ये बुझधवारी एका घराच्या बाथरुममध्ये होळी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. याची माहिती त्यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना दिली. पोलिसांनी दोघांचेशी मृतदेह पोस्टमार्टेमला पाठविले आहेत. 

दीपक (४०) आणि शिल्पी (३६) हे दोघेही खाली होळी खेळून, रंगात न्हाऊन अंघोळीला गेले होते. दोघेही एकाचवेळी एकाच बाथरुममध्ये अंघोळीला गेले होते. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुममध्ये ते होते. यावेळी त्यांनी गरम पाण्यासाठी गिझर सुरु केला. हा गॅस गिझर होता. यातच गॅस लीक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि बेशुद्ध झाले. 

खूप वेळ झाला तरी दोघे बाहेर न आल्याने मुलांनी वरती जाऊन बाथरुमचा दरवाजा उघडला असता दोघेही विवस्त्रावस्थेत निपचित पडलेले दिसले. मुलांनी बाहेर येऊन शेजाऱ्यांना याची माहिती दिली. दोघांनाही गाझियाबादच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Shocking! After playing Holi, husband and wife went to bath together in the bathroom; Death of both due to gas geyser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.