धक्कादायक! युट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने केला प्रेयसीच्या गर्भपाताचा प्रयत्न, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:14 PM2020-03-24T21:14:43+5:302020-03-24T21:17:33+5:30
या प्रकरणात पाथिरीवेदु पोलिसांनी २७ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.
चेन्नई - युट्यूबवरील व्हिडिओ पाहून गरोदर असणाऱ्या आपल्या १९ वर्षीय प्रेयसीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्याचा धक्कादायक प्रकार चेन्नईमधील तिरुवल्लूर येथे घडला आहे. या सर्व प्रकारामुळे तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर चेन्नईमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पाथिरीवेदु पोलिसांनी २७ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशयित एस. सौंदर (२७) हा गुम्मिडीपुडीजवळील कम्मरपालम येथील रहिवासी आहे. तो एलपीजी सिलिंडर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि त्याचे एका १९ वर्षीय तरुणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी महाविद्यालयात बी.कॉम द्वितीय वर्षात शिकत होती. या तरुणीला दिवस गेल्याने ती गर्भवती राहिली.पण सौंदरच्या कुटूंबाचा विरोध असल्याने हे जोडपे लग्न करू शकले नाहीत. त्यानंतर लग्नाला अडचण येत असल्याने दोघांनी अर्भक गर्भातून काढण्याचा निर्णय घेतला. तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. नंतर युट्युबवर नवजात बालकाच्या डिलिव्हरीचे व्हिडीओ पहिले आणि सौंदरने प्रेयसीवर शस्त्रक्रिया करायचे ठरविले. त्याला तरुणीने देखील सहमती दर्शवली. त्यानुसार सौंदरने तिला दुचाकीवरुन काजूच्या शेतात नेले, जिथे त्याने यूट्यूब व्हिडिओंद्वारे तिच्यावर शस्त्रक्रिया केली. दरम्यान अर्भकाचा खांद्यांकडील अवयव मोडला आणि तरुणीला खूप रक्तस्राव होऊ लागला. त्याने तिला आपल्या मोटारसायकलवरून गावापासून २५ किमी दूर असलेल्या गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटलला नेले. त्यानंतर तिला रॉयपुरम येथील शासकीय राजा सर रामास्वामी मुदलीयार लेट-इन हॉस्पिटलमध्ये रूग्णवाहिकेत नेण्यात आले आणि तेथेच तिने एका बाळाला जन्म दिला. नंतर तरुणीला अँब्युलन्समधून रोयापुरममधील शासकीय राजा सर रामास्वामी मुदलीयार लाईंग - इन हॉस्पिटलमध्ये दाखल केल.
तिच्यासोबत आलेल्या तरुणाला रुग्णालयाच्या आवारात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुण आणि तरुणीच्या पालकांची चौकशी केली जात आहे. तिरुवल्लूर जिल्ह्याचे एसपी पी. अरविंद यांनी सांगितले की, तरुणीच्या जबाबावरून तरुणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे.