धक्कादायक! मुलगी झाल्याची ईर्ष्या; मोठ्या काकीने चिमुरडीला पाण्यात बुडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:37 PM2020-04-25T16:37:56+5:302020-04-25T16:39:32+5:30
या भीषण हत्येच्या बातमीने गावकरी हैराण झाले. मुलीच्या कुटूंबालाही घटनेचा धक्का बसला आहे.
रायपूर - घरातच टेरेसवर एका चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 1 वर्षाच्या चिमुकलीची पाण्याच्या टाकीत बुडून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी मुलीच्या मोठ्या काकीला अटक केली आहे. माना पोलीस स्टेशन परिसरातील टेमरी या गावात एका वर्षाच्या निरागस मुलीची छतावरील पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून हत्या केली. या भीषण हत्येच्या बातमीने गावकरी हैराण झाले. मुलीच्या कुटूंबालाही घटनेचा धक्का बसला आहे.
माना पोलिस स्टेशनचे प्रभारी दुर्गेश रावटे यांनी सांगितले की, टेमारी गावात घराच्या छतावर पाण्याच्या टाकीच्या आत एका मुलीचा मृतदेह आढळला. मुलीच्या कुटूंबाच्या चौकशीदरम्यान मुलीच्या आईने सांगितले की आपण सकाळी मुलीला दूध दिले व तिला खोलीत झोपायला दिले आणि काही अंघोळीसाठी निघून गेली. काही वेळाने ती परत आली तेव्हा खोलीत मुलगी नव्हती.
बराच वेळ शोध घेतल्यानंतर छतावरील टाकी व घराकडे लोकांचे लक्ष गेले. टाकीच्या झाकणावर लाकडाचा एक जड ब्लॉक ठेवण्यात आला होता. झाकण उघडून एका मुलीला पाण्यात बुडवून आत सोडले होते. तिला जिवंत समजून कुटुंबीयांनी आंबेडकर रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार,मुलगी असल्याच्या ईर्ष्येने आरोपी राजेश्वरी साहूने गीतांजली साहू या 1 वर्षाच्या मुलीची हत्या केली. 21 एप्रिल रोजी 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. टेमरी गावात घरातील पाण्याच्या टाकीमध्ये एक वर्षाच्या मुलगी गीतांजली साहूचा मृतदेह सापडला.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना मृताची मोठी काकी राजेश्वरी साहू सतत आपले वक्तव्य बदलत असल्याचे निदर्शनास आले.