Crime news UP: धक्कादायक! महिला रुग्णावर मध्यरात्री कंपाऊंडरकडून बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 09:14 AM2021-09-11T09:14:09+5:302021-09-11T09:15:16+5:30

Crime news: 25 वर्षीय पीडितेला काही दिवसांपूर्वीच एक हॉस्पिटलमध्ये सर्दी, तापामुळे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. पीडितेचा आरोप आहे, की रात्री कंपाऊंडरने तिच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला.

Shocking! Attempted rape of a female patient by compounder in Hospital | Crime news UP: धक्कादायक! महिला रुग्णावर मध्यरात्री कंपाऊंडरकडून बलात्काराचा प्रयत्न

Crime news UP: धक्कादायक! महिला रुग्णावर मध्यरात्री कंपाऊंडरकडून बलात्काराचा प्रयत्न

Next

उत्तर प्रदेशच्या आझमगडमधून एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या महिलेवर कंपाऊंडरने बलात्काराचा प्रयत्न केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कंपाऊंडरला अटक केली आहे, तसेच त्याची चौकशी सुरु आहे. (Patient Raped by compounder in UP's Azamgadh, arrested.)

25 वर्षीय पीडितेला काही दिवसांपूर्वीच एक हॉस्पिटलमध्ये सर्दी, तापामुळे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. पीडितेचा आरोप आहे, की रात्री कंपाऊंडरने तिच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला. हा प्रकार आझमगडच्या जीयनपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका खासगी नर्सिंग होममधील आहे. येथे 6 सप्टेंबरला ही महिला भरती झाली होती. पतीने सांगितले की, पत्नीसोबत कंपाऊंडर रात्री अत्याचार करत होता. मला जाग आल्याचे कळताच कंपाऊंडर तेथून पळाला. 

पतीने हे पाहताच आरडाओरडा सुरु केला. यामुळे पूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. लगेचच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तिथे येऊन कंपाऊंडरला ताब्यात घेतले. तो गेल्या 4 वर्षांपासून तिथे नोकरी करत असल्याचे सांगण्यात आले. 

आझमगडचे एसपी सुधीर सिंह यांनी सांगितले की, पीडितेने आरोप लावला की कंपाऊंडरने तिच्यावर बलात्कार केला. घटनेवेळी पीडितेचा पतीदेखील त्याच खोलीत झोपला होता. त्याचीदेखील चौकशी केली जाईल. कंपाऊंडरला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. जे काही सत्य समोर येईल, ते ठेवले जाईल.

Read in English

Web Title: Shocking! Attempted rape of a female patient by compounder in Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.