धक्कादायक! खाडीत आढळला अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:47 PM2021-08-20T20:47:00+5:302021-08-20T20:47:40+5:30

The body of an unidentified man found : 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Shocking! The body of an unidentified man between the ages of 30 and 35 was found in the creek | धक्कादायक! खाडीत आढळला अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह

धक्कादायक! खाडीत आढळला अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह

Next
ठळक मुद्देशुक्रवारी दुपारच्या सुमारास रेतीबंदर, गणेश विसर्जन घाट, मुंब्रा याठिकाणी खाडी किनारी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये दिली होती.

ठाणे : मुंब्रा शहराजवळील रेतीबंदर खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळून आला. ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला. 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
       

शुक्रवारी दुपारच्या सुमारास रेतीबंदर, गणेश विसर्जन घाट, मुंब्रा याठिकाणी खाडी किनारी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये दिली होती. मिळालेल्या माहिती नुसार, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असून मयत व्यक्तीची लवकरच ओळख पटवण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कळवा पोलीस करीत आहेत.

Web Title: Shocking! The body of an unidentified man between the ages of 30 and 35 was found in the creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.