धक्कादायक! गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी मुलाने महिलेवर केले चाकू-हातोड्याने वार
By बाळकृष्ण परब | Published: February 27, 2021 11:12 AM2021-02-27T11:12:21+5:302021-02-27T11:13:32+5:30
Crime News : गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमचे पेव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र हे मोबाइलवरील ऑनलाइन गेम मुलांसाठी किती धोकादायक असू शकतात, याचा प्रत्यय एका घटनेमधून आला आहे.
देहराडून - गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमचे पेव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र हे मोबाइलवरील ऑनलाइन गेम मुलांसाठी किती धोकादायक असू शकतात, याचा प्रत्यय देहराडूनमधील एका घटनेमधून आला आहे. (Crime News)येथे ऑनलाइन गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी एका मुलाने रस्त्यावरून जात असलेल्या महिलेच्या डोक्यावर हातोड्याने आणि चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Oniline Game) पोलिसांनी याबाबत प्राथमिक तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासामध्ये ऑनलाइन गेमिंग चॅट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या आधारावर टास्क पूर्ण करण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. (The boy stabbed the woman to complete the task in the game)
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री देहराडूनमधील स्वर्ण गंगा एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या ज्योती नेगी नामक महिलेवर कुण्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी ही महिला कॉलनीमधील रस्त्यावर फिरत होती. तिचा पती जवळच असलेल्या दुकानात दूध घेण्यासाठी गेला होता. नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारीमध्ये महिलेच्या पतीने सांगितले की, अज्ञात व्यक्तीने ज्योतीवर हातोडा आणि चाकूने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून प्रोजेक्ट फाइल, हातोडा आणि भाजी कापायचा चाकू जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पीडित महिलेने सांगितले की, हल्लेखोराने तिच्यावर डोक्याचा मागील बाजूस हल्ला केला. त्यानंतर पोलीस माझ्याजवळ आले. तसेच त्यांनी मला एका मुलाचा फोटो दाखवला. दरम्यान, या फोटोमधील मुलानेच माझ्यावर हल्ला केला, असे महिलेने सांगितले. दरम्यान, जा मुलाचा फोटो महिलेला दाखवला गेला तो फरार आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.