OMG! जुळ्या बहिणींची हत्या इन्स्टाग्रामवर दाखवली लाइव्ह, बघणाऱ्यांचा उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:12 PM2021-07-21T15:12:24+5:302021-07-21T15:14:18+5:30
ब्राझीलच्या पॅकाजसमद्ये राहणाऱ्या १८ वर्षीय विवाहित जुळ्या बहिणी अमालिया आणि अमांडा अल्वेस (Amalia and Amanda Alves) यांची नुकतीच रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
ब्राझील (Brazil) मध्ये दोन जुळ्या बहिणींची (Twin sisters Murder) निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.. इतकंच नाही तर त्यांच्या हत्येचं लाइव्ह प्रसारणही करण्यात आलं. दोघींची हत्या इन्स्टाग्रामवर लाइव्ह दाखवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली. असं सांगितलं जात आहे की, हत्याकांडामागे ड्रग्स तस्करी करणाऱ्या गॅंगचा हात आहे.
घरातून काढून केली हत्या
'द सन'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ब्राझीलच्या पॅकाजसमद्ये राहणाऱ्या १८ वर्षीय विवाहित जुळ्या बहिणी अमालिया आणि अमांडा अल्वेस (Amalia and Amanda Alves) यांची नुकतीच रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी दोन्ही बहिणींना घरातून घेऊन गेले होते. काही अंतरावर जाऊन त्यांनी दोघींची हत्या केली. ही घटना इन्स्टाग्रामवर लाइव्ह दाखवण्यात आली.
मृत्यूआधी काय झालं..
अमांडाला तीन वर्षाची लहान मुलगी आहे. तर अमालिया नुकतीच आई झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका १७ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, हल्लखोरांनी दोन्ही बहिणींना रस्त्यावर नेलं. त्यांना केस बांधण्यास सांगितलं आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
ड्रग्स डीलरची होती माहिती
पोलिसांनी हत्येच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र, स्थानिक लोक या घटनेकडे ड्रग्सशी जोडून बघत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, दोन्ही बहिणींना तस्करांबाबत माहिती होती. लोकल न्यूजपेपर Jornal de Brasília च्या वृत्तानुसार, अमालिया आणि अमांडा अल्वेस यांना स्थानिक ड्रग्स डीलर्सबाबत बरीच माहिती होती. तेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं.