घरच्यांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं, दुसऱ्याच दिवशी तरुणी प्रियकरासोबत 'या' वस्तु घेऊन झाली फरार; सासरच्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:45 PM2023-03-30T15:45:06+5:302023-03-30T15:46:04+5:30
बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचे कॉलेजमधील एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू असते. तरुणीच्या घरच्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. पण, घरच्यांनी या प्रेम प्रकरणाला विरोध केला. नातेवाईकांनी तरुणीच्या लग्नाची बोलणी दुसऱ्या तरुणासोबत सुरू केली. तरुणीने याला नकार दिला नाही. घरच्यांनी लग्न लावून दिलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणी मित्रासोबत पळून गेली, जाताना तरुणीने सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तुही पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच धक्का बसला आहे.
या विरोधात पतीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तरुणी आणि तिच्या प्रियकराला दागिन्यांसह पकडले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रियकराला ताब्यात घेतले. पतीच्या तक्रारीवरून बेनीबाड ओपी पोलिसांनी कारवाई केली. ही घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. बेनीबाड ओपी परिसरातील गावात लग्न होऊन अवघ्या वर्षभरातच नवविवाहितेने सासरच्या घरातून दागिने व रोख रक्कम घेऊन प्रियकरासह पलायन केले.
बालिकेचा विनयभंग करणाऱ्यास कारावास, मिळाली एवढी शिक्षा
या घटनेनंतर पतीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत नवविवाहित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही वसुली केली. पोलिसांनी अगोदर नवविवाहित महिलेच्या प्रियकराला पकडून चौकशी केली. यानंतर नवविवाहित महिलेला पकडण्यात आले असून, तिच्याकडून सोबत घेतलेले दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. मात्र, नवविवाहित महिलेने पतीविरोधात आरोप केले आहेत.
त्या तरुणाने विवाहित महिलेला फक्त मदत केली होती. मात्र, तो प्रियकर होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. आता पोलिसांनी तरुणाला कारागृहात पाठवले असून पुढील कारवाई करत आहे.